Gold Silver Rate Today | सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, चांदीत किंचित उसळी, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 13 March 2024 | सोने आणि चांदीने या आठवड्यात तशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूत कोणतीच मोठी अपडेट आलेली नाही. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने मोठी भरारी घेतली होती. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

Gold Silver Rate Today | सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, चांदीत किंचित उसळी, अशा आहेत किंमती
सोने स्वस्त, चांदीत उसळी
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 8:32 AM

नवी दिल्ली | 13 March 2024 : मार्च महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत भयावह दरवाढ ग्राहकांनी अनुभवली. सोने आणि चांदीच्या भावाने रेकॉर्ड ब्रेक केले. सोन्याच्या किंमतींनी 66,000 चा टप्पा ओलांडला तर चांदीने 75 हजारांच्या पुढे आगेकूच केली. जानेवारी आणि फेब्रुवारीत किंमतीत चढउतार झाला. पण नवीन रेकॉर्ड करता आला नाही. दोन्ही धातूंनी ही कसर मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांतच भरुन काढली. किंमती गगनाला भिडल्या. सोने मागील दहा दिवसांत 3,430 रुपयांनी तर चांदीत 2300 रुपयांनी उसळली. मौल्यवान धातूच्या काय आहेत किंमती (Gold Silver Price Today 13 March 2024)..

सोन्याची दमदार आघाडी

मार्चमधील सुरुवातीच्या दहा दिवसांत सोन्याने दमदार आघाडी उघडली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण सोने महागले. या आठवड्यात सोन्याने उसंत घेतली. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,880 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 500 रुपयांनी वधारली

मार्च महिन्यात चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली होती. तर 12 मार्च रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 76,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 65,566 रुपये, 23 कॅरेट 65,303 रुपये, 22 कॅरेट सोने 60,059 रुपये झाले.18 कॅरेट 49,175 रुपये, 14 कॅरेट सोने 38,356 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,675 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.