AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 August 2024 : सोने आणि चांदी झाले महाग, आता किती वाढली किंमती, जाणून घ्या एका क्लिकवर

Gold Silver Rate Today 14 August 2024 : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीचा तोरा वाढला. दोन्ही धातूंनी गेल्या आठवड्याच्या अखेरीस सुरु असलेले दरवाढीचे सत्र कायम ठेवले. आता मौल्यवान धातूच्या काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 14 August 2024 : सोने आणि चांदी झाले महाग, आता किती वाढली किंमती, जाणून घ्या एका क्लिकवर
सोने आणि चांदीचा दर
| Updated on: Aug 14, 2024 | 8:45 AM
Share

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांचा खिसा कापला. तर या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढीचे सत्र कायम आहे. 15 ऑगस्ट रोजी मौल्यवान धातू खरेदी करण्यासाठी अनेकांची योजना आहे. पण वाढलेल्या दराने काहींच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीच्या चार दिवसात मौल्यवान धातूत मोठी पडझड झाली होती. सध्या मौल्यवान धातूत दरवाढ झाली आहे. आता अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 14 August 2024 )

सोने वधारले

या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसात सोने वधारले आहे. पहिल्या दिवशी सोमवारी सोने 270 रुपयांनी वाढले. तर 13 ऑगस्ट रोजी त्यात 104 रुपयांची भर पडली. आज सकाळच्या सत्रात पण सोने भरारी घेण्याचे संकेत देत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,580 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने मारली मुसंडी

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 4200 रुपयांनी उतरली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी हजार रुपयांनी महागली. सोमवारी 12 ऑगस्ट रोजी चांदी किलोमागे 600 रुपयांनी उतरली. तर 13 ऑगस्ट रोजी 1 हजार रुपयांनी किंमती वधारल्या. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीची शक्यता आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70444, 23 कॅरेट 70,162, 22 कॅरेट सोने 64,527 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,833 रुपये, 14 कॅरेट सोने 41,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 80,702 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात