Gold Silver Rate Today : सोने-चांदीची उसळी, खरेदीपूर्वी जाणून घ्या भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात दरवाढीची आघाडी उघडली. सोन्यापेक्षा चांदीने चांगली वाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. चांदीतही मोठी घसरण झाली. आज सराफा बाजारात खरेदीचा विचार करत असाल तर अधिक पैसा खरेदी करावा लागू शकतो, इतके वधारले भाव...

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची उसळी, खरेदीपूर्वी जाणून घ्या भाव
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली | 15 नोव्हेंबर 2023 : दिवाळीत सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. धनत्रयोदशीला मौल्यवान धातूत दरवाढ झाली. त्यानंतर घसरण झाली. ग्राहकांना दिवाळी पाडव्याला पुन्हा दरवाढीचा अनुभव आला. ऑक्टोबर महिन्यात मौल्यवान धातूंनी मोठी मजल मारली होती. त्यानंतर भाव उतरले. दिवाळीत चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्याची सुरुवात दरवाढीने झाली. सोन्यापेक्षा चांदीने चांगलीच आघाडी घेतली. सध्या सोने-चांदीत (Gold Silver Price Today 15 November 2023) गुंतवणूक करणे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या दिवाळीपेक्षा दोन्ही धातूंनी चांगला परतावा दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत असाच जोरदार परतावा मिळण्याची शक्यता आहे. दरवाढीमुळे सोने-चांदीमुळे ग्राहकांच्या खिशावर इतका ताण पडला आहे.

सोन्याची दरवाढ

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. भावात चांगलीच घसरण झाली. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी किंमती वधारल्या. 31 ऑक्टोबरपासून तशी घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात पण सोन्यात चांगलीच घसरण झाली होती. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 600 रुपयांनी वधारली

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. सोमवारी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,071 रुपये, 23 कॅरेट 59,791 रुपये, 22 कॅरेट सोने 55,025 रुपये झाले. 18 कॅरेट 45,053 रुपये, 14 कॅरेट सोने 35,142 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदी घसरली. एक किलो चांदीचा भाव 69,951 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.