AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 16 June 2024 : सराफा बाजारात वीकेंडची खरेदी पडणार महागात, सोने-चांदीच्या किंमती वधारल्या

Gold Silver Rate Today 16 June 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीला कमाल दाखविता आली नाही. दोन्ही धातूत चढउताराचे सत्र सुरु आहे. आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूच्या किंमतीत अचानक उसळी आली. त्यामुळे खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

Gold Silver Rate Today 16 June 2024 : सराफा बाजारात वीकेंडची खरेदी पडणार महागात, सोने-चांदीच्या किंमती वधारल्या
सोने-चांदीचा दरवाढीचा दणका
| Updated on: Jun 16, 2024 | 8:28 AM
Share

गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीला मोठी कमाल दाखविता आली नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मौल्यवान धातूंनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले. नवीन विक्रम नावावर केले. गेल्या काही दिवसांत बेशकिंमती धातूत चढउताराचे सत्र आहे. गेल्या दोन आठवड्यात कोणताही उच्चांक या धातूंनी गाठलेला नाही. या आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूंचा भाव अचानक वधारला. त्यामुळे वीकेंडला खरेदीचा प्लॅन करणाऱ्या अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. काय आहेत सोने आणि चांदीच्या किंमती? (Gold Silver Price Today 16 June 2024 )

सोन्याने घेतली भरारी

या आठवड्यात सोन्याने भरारी घेतली नव्हती. पण वीकेंडला मौल्यवान धातूने उसळी घेतली. त्यामुळे या 6 दिवसांत सोने हजार रुपयांनी वधारले. 10 जूनला भावात बदल झाला नाही. 11 जूनला 170 रुपये, 12 जूनला 320 रुपयांनी दरवाढ झाली. तर 13 जूनला भाव स्थिर होता. 14 जून रोजी 270 रुपयांनी सोने उतरले. 15 जूनला सोन्याने 660 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव वधारला

10 जूनला चांदी 200 रुपयांनी तर 11 जूनला 1200 रुपयांनी घसरली. 12 जूनला 800 रुपयांची दरवाढ झाली. 13 जून रोजी 600 रुपयांनी चांदी घसरली. 14 जून रोजी 200 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. तर 15 जून रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,866 रुपये, 23 कॅरेट 71,578 रुपये, 22 कॅरेट सोने 65,829 रुपये झाले. 18 कॅरेट 53,900 रुपये, 14 कॅरेट सोने 42,042 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,833रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली