AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | ग्राहकांचा हिरमोड, सोने आणि चांदीची दरवाढ, इतके वधारले भाव

Gold Silver Rate Today 16 March 2024 | सोने आणि चांदीच्या तेजीला या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रेक लागला. पण अखेरच्या टप्प्यात मौल्यवान धातूने उसळी घेतली. अमेरिकन आणि जागतिक घडामोडींमुळे हा परिणाम झाला आहे. सराफा बाजारात काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today | ग्राहकांचा हिरमोड, सोने आणि चांदीची दरवाढ, इतके वधारले भाव
सोने आणि चांदी महागलेImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 16, 2024 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली | 16 March 2024 : या आठवड्यात सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. न्हा उचल खाल्ली. किंमतीत पुन्हा वाढ झाली. गेल्या आठवड्यात किंमतींनी कहर केला होता. 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी घौडदौड केली. 11 मार्चपासून दरवाढ झाली नाही. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात मात्र मौल्यवान धातूच्या किंमती झरझर चढल्या. सराफा बाजारात ग्राहकांना आता अधिक दाम मोजावे लागणार आहेत. त्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. काय आहे सोने आणि चांदीची किंमती (Gold Silver Price Today 16 March 2024)..

  1. सोने वधारले – या महिन्याच्या सुरुवातीला दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वधारले. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल झाला नाही. 12 मार्च केवळ 10 रुपयांनी भाव कमी झाला. 13 मार्च रोजी 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी वधारले. काल किंमतीत बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीची भरारी – मार्चच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी महागली. 11 मार्च रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. 12 मार्च रोजी 500 रुपयांनी भाव वाढले. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. 14 मार्च रोजी चांदीने 1800 रुपयांची झेप घेतली. काल  किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागले. 24 कॅरेट सोने 65,559 रुपये, 23 कॅरेट 65,297 रुपये, 22 कॅरेट सोने 60,052 रुपये झाले.18 कॅरेट 49,169 रुपये, 14 कॅरेट सोने 38,352 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,210 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...