AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 17 September 2024 : बाप्पा निघाले गावाला; लगाम घाला सोने आणि चांदीच्या दरवाढीला, भाविकांची प्रार्थना; भाव तरी काय सराफा बाजारात?

Gold Silver Rate Today 17 September 2024 : गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरवाढीने ग्राहक हैराण झाले आहेत. सोन्यासह चांदीने भरारी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या आठवड्यात पण दोन्ही धातूंमध्ये दरवाढीचे सत्र सुरूच आहे.

Gold Silver Rate Today 17 September 2024 : बाप्पा निघाले गावाला; लगाम घाला सोने आणि चांदीच्या दरवाढीला, भाविकांची प्रार्थना; भाव तरी काय सराफा बाजारात?
सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Sep 17, 2024 | 8:36 AM
Share

सोने आणि चांदीने गेल्या आठवड्यापासून तुफान बॅटिंग केली. गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत सोन्यात 1,000 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीत या काळात 8,600 रुपयांची वाढ दिसली. या दोन्ही धातूची नवीन विक्रमाच्या दिशेने घौडदौड सुरू आहे. जळगावच्या सराफा बाजारात पण दोन्ही धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तर देशातील अनेक सराफा पेठेत मौल्यवान धातु लवकरच कमाल करुन दाखवण्याची शक्यता आहे. सणासुदीत बेशकिंमती धातूंच्या या तुफान खेळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता काय आहेत मौल्यवान धातूच्या किंमती? (Gold Silver Price Today 17 September 2024 )

सोन्याची घौडदौड सुरूच

गेल्या आठवड्यात सोने 900 रुपयांहून अधिकने वधारले. आठवड्याच्या अखेरीस सुद्धा मौल्यवान धातूची घौडदौड सुरूच होती. या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या महागाईनेच झाली. आता हा धातूत किती उसळी घेतो हे लवकरच समोर येईल. या सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. तर आजही सकाळच्या सत्रात सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,895 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची दणकेबाज सुरुवात

चांदीने गेल्या आठवड्यात 7 हजारांची उसळी घेतली. चांदीच्या या तुफान फटकेबाजीने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. दरवाढीचे सत्र या आठवड्यात पण दिसून आले. सोमवारी 16 सप्टेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत 100 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 73489, 23 कॅरेट 73,195, 22 कॅरेट सोने 67,316 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 55,117 रुपये, 14 कॅरेट सोने 42,991 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,314 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?