AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 21 August 2024 : सोने वधारले, तर चांदीने पण घेतली उसळी, आता काय आहेत किंमती? इतकी बसली खिशाला झळ

Gold Silver Rate Today 21 August 2024 : सोने आणि चांदीने ग्राहकांना झटका दिला. या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी भावात मोठी वाढ झाली. काल भावात घसरण झाल्यानंतर आज ग्राहकांचा खिशा कापल्या गेला. 10 ग्रॅम सोन्यासाठी त्यांना इतके रुपये मोजावे लागले.

Gold Silver Rate Today 21 August 2024 : सोने वधारले, तर चांदीने पण घेतली उसळी, आता काय आहेत किंमती? इतकी बसली खिशाला झळ
सोन्याचा भाव वधारला
| Updated on: Aug 21, 2024 | 3:22 PM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी झटका दिला. भावात मोठी वाढ झाली. मंगळवारी सोन्यात घसरण झाली होती. गेल्या आठवड्यात एक दिवसाच्या गॅपनंतर सोने 600 रुपयांनी तर चांदी 4 हजारांनी उसळली होती. रक्षाबंधनाअगोदर भाव वधारले होते. तर या आठवड्यात मौल्यवान धातूच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसत आहे. आता असा आहे बेशकिंमती धातूचा भाव (Gold Silver Price Today 21 August 2024 )

सोने 500 रुपयांनी वधारले

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलासोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मंगळवारी सोन्याच्या दरात 120 रुपयांनी घसरण झाली. तर 21 ऑगस्ट रोजी बुधवारी सोने 550 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 1 हजारांची झेप

गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची झेप घेतली होती. तर या आठवड्यात सुरुवातीला चांदीत सुस्तावली होती. मंगळवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर आज किंमतीत कोणताच बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,945, 23 कॅरेट 71,657, 22 कॅरेट सोने 65,902 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,959 रुपये, 14 कॅरेट सोने 42,088 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,321 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा