Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 21 December 2024 : सोने-चांदीत तुफान पडझड, अवघ्या तीन दिवसांत 10 ग्रॅममागे इतका कमी झाला भाव, आता किंमत काय?

Gold Silver Rate Today 21 December 2024 : सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत सोन्यात सलग घसरण झाली. तर दुसरीकडे चांदीची किंमत पण घसरली. आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. इतक्या कमी झाल्या किंमती...

Gold Silver Rate Today 21 December 2024 : सोने-चांदीत तुफान पडझड, अवघ्या तीन दिवसांत 10 ग्रॅममागे इतका कमी झाला भाव, आता किंमत काय?
सोने-चांदी किंमत
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 8:33 AM

या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सलग तीन दिवसांपासून सोन्यात सलग घसरण होत आहे. चांदीच्या किंमती पण उतरल्या. गेल्या आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुच्या किंमती उतरल्या होत्या. तर या आठवड्यात दोन्ही धातुना सूर गवसला नाही. बेशकिंमती धातुत मोठी घसरण झाली. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्याचे परिणाम शेअर बाजाराप्रमाणे सराफा बाजारावर दिसून येत आहे. आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. इतक्या कमी झाल्या किंमती… (Gold Silver Price Today 21 December 2024 )

सोन्यात मोठी पडझड

मागील आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले आणि 1600 रुपयांनी स्वस्त झाले. तर या आठवड्यात सलग तीन दिवसांच्या घसरणीने सोने 1200 रुपयांनी उतरले. मंगळवारी सोने 110 रुपयांनी वधारले तर बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण दिसली. गुरुवारी सोने 710 रुपयांनी स्वस्त झाले. 20 डिसेंबर रोजी किंमती 330 रुपयांनी उतरल्या. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी दोन हजारांनी स्वस्त

मागील आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर 5 हजारांनी स्वस्त झाली. तर या आठवड्यात चांदी दोन हजारांनी स्वस्त झाली. गुरूवारी आणि शुक्रवारी चांदी सलग दोन किंमत उतरल्याने मौल्यवान धातु 2000 रुपयांनी उतरली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,377, 23 कॅरेट 75,075, 22 कॅरेट सोने 69,045 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,533 रुपये, 14 कॅरेट सोने 44,096 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,133 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.