Gold Silver Rate Today 22 June 2024 : सोने-चांदीची तुफान फटकेबाजी; एकाच दिवसात भरुन काढली सर्व कसर, भाव तरी काय

Gold Silver Rate Today 22 June 2024 : सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. या आठवड्याच्या शेवटी इतक्या दिवसाची दरवाढीची कसर भरुन काढली. मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली. सोन्याने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली.

Gold Silver Rate Today 22 June 2024 : सोने-चांदीची तुफान फटकेबाजी; एकाच दिवसात भरुन काढली सर्व कसर, भाव तरी काय
सोने-चांदीची जोरदार मुसंडी
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 10:22 AM

सोने आणि चांदीने एकाच दिवसात दरवाढीचा इतक्या दिवसांचा बॅकलॉग भरुन काढला. या महिन्यात मौल्यवान धातूंना सूर गवसलेला नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यासारखा कोणताही रेकॉर्ड अद्याप नावावर नोंदवलेला नाही. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात आतापर्यंत चढउताराचे सत्र होते. आता अखेरच्या टप्प्यात दोन्ही धातूंनी जोरदार मुसंडी मारली. किंमती एकदम उसळल्या. आता काय आहे भाव?(Gold Silver Price Today 22 June 2024 )

सोन्याची जोरदार मुसंडी

या आठवड्याच्या आखेरीस सोन्याने जोरदार मुसंडी मारली. सुरुवातीला 17 जूनला सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर दुसऱ्या दिवशी भावा बदल झाला नाही. 20 जूनला 220 रुपयांनी भाव वधारला. तर 21 जूनला सोन्याने 810 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी 4000 रुपयांनी वधारली

या आठवड्यात चांदी 4000 रुपयांनी वधारली. अखरेच्या सत्रात चांदीने 3 हजारांची मुसंडी मारली. 15 जूनला चांदीत 500 रुपयांची दरवाढ दिसली. नंतरच्या दोन दिवसात किंमतीत बदल झाला नाही. 18 जूनला 500 रुपयांनी चांदी वधारली. दुसऱ्या दिवशी भाव तितकाच कमी झाला. चांदी 20 आणि 21 जून रोजी प्रत्येकी 1500 रुपयांनी म्हणजे एकूण 3,000 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,000 रुपये आहे.

जळगावच्या सराफा बाजारातील भाव

जळगावच्या सराफ बाजारात तीन दिवसांत चांदीच्या दरात अडीच हजाराने वाढ झाली तर सोने ८०० रुपयांनी वधारले. चांदीचा भाव ९१,५०० रुपयांवर तर सोन्याचे दर पुन्हा ७३ हजारांवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 72,746 रुपये, 23 कॅरेट 72,455 रुपये, 22 कॅरेट सोने 66,635 रुपये झाले. 18 कॅरेट 54,560 रुपये, 14 कॅरेट सोने 42,556 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,666 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.