AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 27 August 2024 : दरवाढीची दहीहंडी फुटली; सोन्याने दिली आनंदवार्ता, चांदीचा पण मोठा दिलासा

Gold Silver Rate Today 27 August 2024 : गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा आहे. या सोमवारी पण मौल्यवान धातूंनी आनंदवार्ता दिली. आज सकाळच्या सत्रात पण घसरणीचे संकेत दिले आहे. दुपारनंतर भावात बदल होऊ शकतो. काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 27 August 2024 : दरवाढीची दहीहंडी फुटली; सोन्याने दिली आनंदवार्ता, चांदीचा पण मोठा दिलासा
सोने-चांदीचा भाव
| Updated on: Aug 27, 2024 | 8:43 AM
Share

गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीत नरमाईचे सत्र होते. मौल्यवान धातूंना मोठी कमाल दाखवता आली नाही. केवळ एकच दिवस भाव वधारला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या भावात कोणताही बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मौल्यवान धातूत घसरणीचे संकेत मिळत आहेत. दुपारनंतर भावात बदल होऊ शकतो. दहीहंडीला बेशकिंमती धातू खरेदीची मोठी संधी आहे. आता या दोन्ही धातूच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 27 August 2024 )

सोन्याचा दिलासा

गेल्या आठवड्यात सोने एकदाच वधारले होते. सोन्यात 670 रुपयांची घसरण दिसली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 200 रुपयांनी स्वस्त

गेल्या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांहून अधिकने वधारली होती. इतर दिवशी चांदीत नरमाईचे सत्र होते. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 200 रुपयांची घसरण दिसून आली. आज सकाळच्या सत्रात चांदीत पडझडीचे संकेत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,800 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA) 24 कॅरेट सोने 72,042, 23 कॅरेट 71,754, 22 कॅरेट सोने 65,991 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 54,032 रुपये, 14 कॅरेट सोने 42,145 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 86,191 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य