AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 January 2025 : Budget पूर्वीच आनंदवार्ता, सोने-चांदीचा स्वस्ताईचा सांगावा, ग्राहकांना दिलासा

Gold Silver Rate Today 28 January 2025 : Budget पूर्वीच सोने आणि चांदीने ग्राहकांना स्वस्ताईचा सांगावा धाडला. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 28 January 2025 : Budget पूर्वीच आनंदवार्ता, सोने-चांदीचा स्वस्ताईचा सांगावा, ग्राहकांना दिलासा
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Jan 28, 2025 | 8:34 AM
Share

मागील दोन आठवड्यात सोन्यासोबतच चांदीने दरवाढीचा दणका दिला. सोन्याने तर मोठी झेप घेतली. मागील दहा-बारा दिवसात सोने 000 रुपयांनी महागले. तर चांदीने मरगळ झटकत हजारांची दरवाढ नोंदवली. ऐन लग्नसराईत सोने आणि चांदीची ही घोडदौड वधू-वर मंडळींना मनस्ताप देऊन गेली. तर या आठवड्याच्या सुरूवातीला दोन्ही धातुत घसरण झाली. चांदी एक हजाराने उतरली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 28 January 2025 )

सोन्याचा ग्राहकांना दिलासा

मागील दोन आठवड्यात सोने 3000 रुपयांनी महागले. सोन्याने मोठी मजल मारल्याने ग्राहक चिंतेत होता. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 170 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी हजाराने उतरली

मागील आठवड्यात चांदी 4 हजार रुपयांनी महागली आणि 2 हजारांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल दिसला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी किंमती वधारल्या. आता 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण दिसली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,397, 23 कॅरेट 80,075, 22 कॅरेट सोने 73,644 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,298 रुपये, 14 कॅरेट सोने 47,032 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,274 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?