AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 November 2024 : घसरणीला ब्रेक, सोने वधारले, चांदीत स्वस्ताई, काय आहेत आता किंमती?

Gold Silver Rate Today 28 November 2024 : सोने आणि चांदीच्या घसरणीमुळे दोन दिवसांपासून सराफा बाजारात गर्दीचा उच्चांक मोडला. गेल्या काही दिवसात दोन्ही धातुच्या दरवाढीमुळे ग्राहकांनी ऐन मौसमात सराफा बाजाराकडे पाठ केली होती. स्वस्ताईमुळे सराफा बाजारात गर्दी झाली.

Gold Silver Rate Today 28 November 2024 : घसरणीला ब्रेक, सोने वधारले, चांदीत स्वस्ताई, काय आहेत आता किंमती?
सोनं आणि चांदी
| Updated on: Nov 28, 2024 | 8:36 AM
Share

गेल्या दोन दिवसांपासून सराफा बाजाराला आनंदाचे भरत आलेले आहे. सोने आणि चांदीच्या दर कमी झाल्याने ग्राहकांची एकच गर्दी उसळली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही धातुत चढउताराचा फायदा ग्राहकांना मिळाला. देशभरात मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सराफा बाजारात ग्राहकांची एकच गर्दी उसळली. या घसरणीमुळे दोन दिवसांपासून खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. तर सोन्याने घसरणीला ब्रेक लावला आहे. त्यात किंचित वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत घसरण आली आहे. सोने आणि चांदीचा आता असा आहे भाव (Gold Silver Price Today 28 November 2024 )

स्वस्ताईनंतर सोन्यात उसळी

गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी उतरले. तर त्यापूर्वी त्यात 3 हजारांची वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 220 रुपयांची घसरण झाली होती. सोमवारी 110 तर मंगळवारी त्यात 120 रुपयांची घसरण झाली होती. काल 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,120 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2500 रुपयांची घसरण

गेल्या आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्याच्या सुरूवातीला किंमतीत तितकीच घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रातही चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,175, 23 कॅरेट 75,870, 22 कॅरेट सोने 69,776 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,131 रुपये, 14 कॅरेट सोने 44,562 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,430 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...