AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 January 2025 : सोने-चांदीचा सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या

Gold Silver Rate Today 29 January 2025 : गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने आणि चांदीने दोन दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. या मौल्यवान धातुच्या किंमती उतरल्या आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 29 January 2025 : सोने-चांदीचा सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या
सोने -चांदी किंमत
| Updated on: Jan 29, 2025 | 9:48 AM
Share

गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने महागाईचा झेंडा लावला. ग्राहकांना मोठा फटका बसला. बजेटपूर्वी किंमती चढ्याच राहण्याची भीती व्यक्त होत होती. या काळात सोने 3,000 रुपयांनी तर चांदी हजार रुपयांनी महागली होती. पण या सोमवार-मंगळवारी दोन्ही धातुत घसरण झाली. ग्राहकांना दिलासा मिळाला. लग्न सराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मौल्यवान धातू खरेदीची संधी मिळाली. 18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती. (Gold Silver Price Today 29 January 2025 )

दोन दिवसांपासून घसरण

15 दिवसात सोने 3000 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. सोमवारी सोने 170 रुपयांनी तर मंगळवारी त्यात 320 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

15 दिवसात चांदी 4 हजार रुपयांनी महागली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही. तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी चांदी महागली होती. 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण दिसली. काल किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 80,313, 23 कॅरेट 79,991, 22 कॅरेट सोने 73,567 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 60,235 रुपये, 14 कॅरेट सोने 46,983 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,750 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...