AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 30 October 2024 : लक्ष्मी पूजनापूर्वीच सोने-चांदीची तुफान बॅटिंग; इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, आता असा आहे भाव

Gold Silver Rate Today 30 October 2024 : धनत्रयोदशीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दिवाळीत सोन्यात गुंतवणूक शुभ मानण्यात येते. भाव कितीही वाढला तरी सराफा बाजारातील गर्दी कमी झाली नाही. मौल्यवान धातुच्या घसरणीनंतर सोने आणि चांदीने गरूड भरारी घेतली. किंमती इतक्या तुफान वाढल्या...

Gold Silver Rate Today 30 October 2024 : लक्ष्मी पूजनापूर्वीच सोने-चांदीची तुफान बॅटिंग; इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, आता असा आहे भाव
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 30, 2024 | 4:15 PM
Share

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र सुरू आहे. मोठ्या दरवाढीनंतर या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत घसरण दिसली होती. गेल्या आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात पण भाव उतरले होते. पण काल आणि आज मौल्यवान धातुनी जोरदार उसळी घेतली आहे. पडझडीनंतर लक्ष्मी पूजनापूर्वी दोन्ही धातुनी जोर लावला. किंमतीत तुफान आले. गुडरिटर्न्सनुसार दोनच दिवसात सोने 1200 रुपयांनी तर चांदी किलोमागे दोन हजारांनी महागली. आता या बेशकिंमती धातुच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 30 October 2024 )

दिवाळीत सोन्याची भरारी

मागील आठवड्यात सोने 1400 रुपयांच्या घरात महागले होते. सोमवारी सोने जवळपास 490 रुपयांनी स्वस्त झाले. तर 29 ऑक्टोबर रोजी सोन्याने 600 रुपयांची आणि 30 ऑक्टोबर रोजी 700 रुपयांची भरारी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 74,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 81,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2 हजारांनी वधारली

चांदीने सुस्ताईला ब्रेक लावला. गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली. मागील आठवड्यात चांदी 3 हजार रुपयांनी महागली होती. तर त्यात 6,000 रुपयांची घसरण झाली होती. तर 29 ऑक्टोबरला आणि 30 ऑक्टोबर रोजी त्यात प्रत्येकी हजारांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,,000 रुपये झाला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,745, 23 कॅरेट 78,430, 22 कॅरेट सोने 72,130 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 59,059 रुपये, 14 कॅरेट सोने 46,066 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,873 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक