AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; राज ठाकरे यांनी भाजपसह शिंदे सेनेला दाखवला ठाकरी बाणा, म्हणाले….

Amit Thackeray Mahim Constituency : राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता ठाकरे कुटुंबात अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. माहिममध्ये महायुतीने उमेदवार द्यावा की नाही याविषयी राज ठाकरे यांनी रोखठोक मत मांडलं आहे.

Raj Thackeray : अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात; राज ठाकरे यांनी भाजपसह शिंदे सेनेला दाखवला ठाकरी बाणा, म्हणाले....
राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे उघडपणे सांगतायत की निकालानंतर भाजपसोबत जाणार. मनसेचे 100 आमदार येणार असा मोठा दावाही त्यांचा आहे. दुसरीकडे भाजपचाच मुख्यमंत्री होईल हेही राज ठाकरेंनी म्हटलंय. त्यावर शिंदेंचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी, मुख्यमंत्रिपदावरुन तात्काळ संख्याबळावर बोट ठेवलंय.
| Updated on: Oct 30, 2024 | 3:49 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता ठाकरे कुटुंबात अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. माहिममध्ये महायुतीने उमेदवार द्यावा की नाही याविषयी राज ठाकरे यांनी रोखठोक मत मांडलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मतं मांडली.

खास ठाकरी फटकारे

सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचे मत मांडले. आम्ही थेट राजकारण करतो. त्यासाठी भलेही वेळ लागतो. राजकारणात तिरकी चाल खेळणाऱ्यांना काही पदं पदरात पाडून घेता येतात. पण अशी राजकीय पोळी जास्त काळ शेकता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लोकांना जोडत जाऊ आणि सत्ता आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीविषयीचा किस्सा

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम मतदार संघातून (Mahim Constituency) उभा आहे. पक्षाने याविषयीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीविषयीचा किस्सा सांगितला. पाच वर्षांपूर्वी आदित्य जेव्हा वरळी मतदारसंघातून उभा होता. या भागात माझं 38-39 हजार मतदान आहे. मी निश्चित केले उमेदवार देणार नाही. मी कोणाशीच याविषयी चर्चा केली नाही की, काही अपेक्षा ठेवली, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप-शिंदे सेनेला रोखठोक

माझा मुलगा यावेळी निवडणुकीत उभा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. माझा मुलगा या ठिकाणी उमेदवार आहे. चांगल्या हेतूने त्यांना उमेदवार द्यायचे नसतील, तर ते नाही देणार उमेदवार, त्यांना उमेदवार द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा. मी कोणती ही मागणी करणार नाही. जर ते पाच वर्षानंतर उमेदवार उभा करणार असतील तर त्यांनी तो आताच द्यावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांची तयारी, पण सरवणकरांची उमेदवारी

माहिम विधानसभा मतदारसंघातून सध्या सदा सरवणकर आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. पण सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीचा सामना होणार हे नक्की आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान