BJP Candidate : जागा तुमची माणसं आमची; उमेदवारांच्या साखर पेरणीचा गोडवा भाजप चाखणार? की बंडोपंत तोंडचा घास हिरावणार..BJP ची इतकी नेते सेनेसह अजितदादांच्या गोटात
Maharashtra Vidhansabha Election 2024 BJP Smart Play : विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने स्मार्ट खेळी खेळली आहे. त्यांचे अनेक शिलेदार आता मित्रपक्षांच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जागा तुमची पण माणसं आमची असा हा फॉर्म्युला आहे., ही साखर पेरणी फायदेशीर ठरणार का?

राज्यात विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाचा काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लागला. रूसवे फुगवे काढण्यात जादा वेळ खर्ची न घालवता महाविकास आणि महायुतीने एकदाचे डोक्यावरील ओझे कमी केले. आता उमेदवार निवडून आणण्याची मोठी कसरत या दोन्ही गटांना करावी लागणार आहे. 2019 मध्ये भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या. 105 जागांवर भाजप विजयी झाली. अर्थात 2014 पेक्षा त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या. पण राज्यात अखंड सेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून बिनसले आणि महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर लोट्स ऑपरेशनने राज्याच्या राजकारणाची दिशा पालटवली. महायुती अस्तित्वात आली. शिंदे सेना आणि अजितदादा गटाला सोबत घेत भाजपने सत्ता मिळवली. भाजप हा मोठा पक्ष होता. पण त्यांना महायुतीच्या तडजोडीत नमतं घ्यावं लागलं. आता विधानसभा निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपाने स्मार्ट खेळी खेळली आहे. जागा तुमची पण माणसं आमची असा हा फॉर्म्युला आहे. त्यांचे अनेक शिलेदार आता मित्रपक्षांच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या साखर पेरणीचा भाजपला किती फायदा होणार? ...
