AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 5 March 2025 : सोने आणि चांदीची तुफान फटकेबाजी, ग्राहकांच्या खिशाला भगदाड, किंमती इतक्या वाढल्या

Gold Silver Rate Today 5 March 2025 : कालच सोने आणि चांदीने दरवाढीचे संकेत दिले होते. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातुच्या दरवाढीचा आलेख उंचावला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 5 March 2025 : सोने आणि चांदीची तुफान फटकेबाजी, ग्राहकांच्या खिशाला भगदाड, किंमती इतक्या वाढल्या
सोने आणि चांदीची मोठी झेपImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 05, 2025 | 9:49 AM
Share

सोने आणि चांदीने या आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी झेप घेतली. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्यात दोन्ही धातु ग्राहकांना दिलासा देतील का? याची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेमधील घडामोडींचा दोन्ही धातुंवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मौल्यवान धातुंनी मोठी झेप घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 5 March 2025 )

सोने 760 रुपयांनी वधारले

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बेशकिंमती धातुविषयी मोठा निर्णय घेण्याची कालपासून चर्चा रंगली आहे. ट्रम्प सरकार या धातुसाठी काही धोरण ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायदे बाजाराच नाही तर सराफा बाजार धास्तावला आहे. सोमवारी सोने 760 रुपये प्रति तोळा महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी झेप

मागील आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर सोमवारी चांदी एक हजार रुपयांनी वधारली. आज सकाळच्या सत्रात चांदीत महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,432, 23 कॅरेट 86,086, 22 कॅरेट सोने 79,172 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,824 रुपये, 14 कॅरेट सोने 50,563 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,293 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?