AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 March 2025 : सोन्यात तुफान, चांदीचे तळ्यातमळ्यात, आता किंमती काय?

Gold Silver Rate Today 6 March 2025 : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अस्थायी नागरिकत्वासाठी सोन्याचे कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याची किंमत सातत्याने वाढत आहे. तर दुसरीकडे चांदीत चढउताराचे सत्र आहे.आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 6 March 2025 : सोन्यात तुफान, चांदीचे तळ्यातमळ्यात, आता किंमती काय?
सोने आणि चांदीची किंमतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 06, 2025 | 8:37 AM
Share

सोन्याने या आठवड्यात जोरदार मुसंडी मारली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अस्थायी नागरिकत्वासाठी गोल्ड कार्ड वापरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची भीती वाढली आहे. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीलाचा दोन दिवसात सोन्याने वसुली केली. किंमती 1200 रुपयांहून अधिकने वाढल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 6 March 2025 )

सोने 1300 रुपयांनी वधारले

या आठवड्यात सोन्याचा आलेख उंचावला. Donald Trump यांच्या धोरणाच्या भीतीने मौल्यवान धातुची किंमत वधारली. सोमवारी सोने 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

गेल्या आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर या सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 98,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,300, 23 कॅरेट 85,954, 22 कॅरेट सोने 79,051 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,725 रुपये, 14 कॅरेट सोने 50,486 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,993 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा