AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7 February 2025 : दरवाढीच्या वादळानंतर काय आहे सोने-चांदीची किंमत? ग्राहकांना पुन्हा झटका?

Gold Silver Rate Today 7 February 2025 : सोने-चांदीत दरवाढीचे तुफान आले. विक्रमामागून विक्रम दोन्ही धातुच्या नावावर नोंदवले गेले. बजेटनंतर दोन्ही धातुनी मोठी झेप घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशी आहे किंमत?

Gold Silver Rate Today 7 February 2025 : दरवाढीच्या वादळानंतर काय आहे सोने-चांदीची किंमत? ग्राहकांना पुन्हा झटका?
सोने-चांदीची किंमत
| Updated on: Feb 07, 2025 | 8:25 AM
Share

नवीन वर्षात सोने आणि चांदीने नवनवीन विक्रम नावावर नोंदवले. दोन्ही धातुनी उच्चांकी झेप घेतली. अजून या धातुत विक्रमी घसरण नोंदवली गेलेली नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात या मौल्यवान धातुच्या कर कपातीविषयी कोणताही फैसला झाला नाही. गेल्यावेळी आयात शुल्क कपातीचा निर्णय ग्राहकांच्या पथ्यावर पडला होता. गेल्या दोन दिवसात सोन्याने मोठी मजल मारली. तर चांदीने नरमाईनंतर पु्न्हा झेप घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 7 February 2025 )

सोन्यात दरवाढ

या आठवड्यात सोन्याने तुफान घोडदौड केली. सोमवारी सोने 440 रुपयांनी स्वस्त झाले होते. मंगळवारी 115 रुपयांनी आणि बुधवारी 1040 रुपयांनी सोने वधारले. तर गुरुवारी त्यात 250 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी लाखाच्या घरात

गेल्या महिन्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. तर या महिन्याच्या सुरुवातीला चांदीला सूर गवसला नही. 4 फेब्रुवारी रोजी चांदी 1 हजार रुपयांनी उतरली. तर बुधवारी चांदी हजारांनी वधारली. काल भाव स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 84,613, 23 कॅरेट 84,274, 22 कॅरेट सोने 77,506 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,460 रुपये, 14 कॅरेट सोने 49,499 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,762 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...