AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 7 March 2025 : आता चांदीत तुफान, सोन्याने घेतली माघार, किंमत तरी काय?

Gold Silver Rate Today 7 March 2025 : गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतींनी कहर केला होता. चांदीने माघार घेतली होती. तर आता उलट बाजू आहे. चांदीत तुफान आले आहेत. तर सोन्याने माघार घेतला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 7 March 2025 : आता चांदीत तुफान, सोन्याने घेतली माघार, किंमत तरी काय?
सोने आणि चांदीची किंमतImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 07, 2025 | 8:37 AM
Share

या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला मोठी मुसंडी मारली. तर चांदीने माघार घेतली होती. दोन दिवसात सोन्याने धुमाकूळ घातला. त्यामुळे एसीमध्ये सुद्धा ग्राहकांना घाम फुटला होता. तर बुधवारी मात्र सोन्यात पडझड झाली. चांदीने मात्र झेप घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा धसका सध्या जगाने घेतला आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारावर सुद्धा दिसून येण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. दोन दिवसात सोने 1200 रुपयांहून अधिकने वाढल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 7 March 2025 )

सोन्याने दिला मोठा दिलासा

या आठवड्यात सोमवारी सोने 760 रुपयांनी तर मंगळवारी 600 रुपयांनी महागले होते. तर बुधवारी सोने 490 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा आलेख उंचावला

मागील आठवड्यात चांदी 5 हजारांनी रुपयांनी उतरली होती. तर या सोमवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर मंगळवारी किंमतीत बदल दिसला नाही. बुधवारी चांदी पुन्हा एक हजारांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,876, 23 कॅरेट 85,532, 22 कॅरेट सोने 78,662 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 64,407 रुपये, 14 कॅरेट सोने 50238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 96,460 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा