AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 June 2024 : दोनच दिवसांत सोने-चांदीची उंच भरारी, केंद्रातील शपथविधीपूर्वी असे वधारले भाव

Gold Silver Rate Today 8 June 2024 : दिल्लीत शपथविधीची लगबग सुरु झाली आहे. तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत येत आहे. हा एक नवीन विक्रम आहे. हा मुहूर्त साधून सोने आणि चांदीने विक्रमाकडे झेप घेतली आहे. भाव इतका वधारला आहे.

Gold Silver Rate Today 8 June 2024 : दोनच दिवसांत सोने-चांदीची उंच भरारी, केंद्रातील शपथविधीपूर्वी असे वधारले भाव
सोने-चांदी वधारले
| Updated on: Jun 08, 2024 | 8:48 AM
Share

केंद्रात सत्ता स्थापन्याच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत शपथविधीची लगबग सुरु झाली आहे. केंद्रात NDA चे तिसऱ्यांदा सरकार येत आहे. एनडीएने विक्रम रचला आहे. तर दुसरीकडे सोने-चांदी पण विक्रमाच्या दिशेने आगेकूच करत आहे. गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली आहे. चांदीने मोठी भरारी घेतली आहे. सोन्याने पण मोठा पल्ला गाठला आहे. काय आहे बेशकिंमती धातूची किंमत? (Gold Silver Price Today 8 June 2024 )

सोने हजाराने वधारले

या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी वधारले. 3 जूनला किंमतीत 440 रुपये, 4 जूनला सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली. तर 5 जूनला 220 रुपयांनी भाव उतरले. 6 जून रोजी सोने 700 रुपयांनी वधारले. 7 जून रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 5500 रुपयांची उसळी

या आठवड्यात 3 जूनला चांदी 700 रुपयांनी स्वस्त झाली. 4 जूनला 1200 रुपयांनी महागली. 5 जूनला 2300 रुपयांनी भाव उतरला. 6 जून रोजी 1800 रुपयांनी तर 7 जूनला 2500 रुपयांनी भाव वधारला. या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने उतरले तर चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 71,913 रुपये, 23 कॅरेट 71,625 रुपये, 22 कॅरेट सोने 65,872 रुपये झाले. 18 कॅरेट 53,935 रुपये, 14 कॅरेट सोने 42,069 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 90,535 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा