AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 October 2024 : सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता; अचानक झाली पडझड, काय आहे आता किंमत?

Gold Silver Rate Today 8 October 2024 : गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीला या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ब्रेक लावला. अचानक दोन्ही मौल्यवान धातुत घसरण आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आज जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, त्याचा परिणाम बाजारावर दिसू शकतो.

Gold Silver Rate Today 8 October 2024 : सोने आणि चांदीने दिली आनंदवार्ता; अचानक झाली पडझड, काय आहे आता किंमत?
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 08, 2024 | 8:40 AM
Share

गेल्या 15 दिवसांपासून सोने आणि चांदीत मोठी उसळी आली होती. या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी मौल्यवान धातुनी जो रेकॉर्ड केला होता. तो या दोन्ही धातुनी पुन्हा तोडला. सोन्याची आता 80 हजारांकडे तर चांदी 1 लाखांकडे वाटचाल करत आहे. जगात दोन ठिकाणी भीषण युद्ध सुरू आहेत. युक्रेन आणि रशिया तर दुसरीकडे हमास, हिजबुल्लाह आणि इराण विरुद्ध इस्त्रायल असा संघर्ष सुरू आहे. परिणामी सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. शेअर बाजारापासून ते सर्वच सेवा, वस्तूंवर त्याचा परिणाम दिसत आहे. अशा स्थितीत या आठवड्यात बेशकिंमती धातुत चांगलीच घसरण झाली आहे. आता अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 8 October 2024 )

मुलूखगिरीनंतर सोने उतरले

गेल्या दोन आठवड्यात सोन्याने 2300 रूपयांची वाढ झाली. त्यापूर्वी पण सोन्याने मोठी आघाडी उघडली होती. सणासुदीत मौल्यवान धातु वधारण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरूवातीला सोन्यात घसरण आली. सोमवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. तर आज सकाळच्या सत्रात सोन्यात 100 रुपयांची घसरण दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 97,000 वर

29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झाला नव्हता. त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चांदीत 2 हजारांची वाढ दिसली. सोमवारी चांदीचा भाव 97 हजारांवर पोहचला. तर 8 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,933, 23 कॅरेट 75,629, 22 कॅरेट सोने 69,555 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,950 रुपये, 14 कॅरेट सोने 44,421 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,940 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याच्या तयारीत?
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत आंदोलनाचा मानस, मराठा आरक्षणावरून नवा सस्पेन्स
'पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता १० लाखांचा दंड'
पान मसाला जाहिरातींवरील कारवाईला उशीर, आता कठोर पाऊले उचलणार: तुकाराम मुंढे
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली; मराठवाडा दौरा रद्द
अशक्तपणा आणि ताप, मनोज जरांगे पाटील यांच्यावर जालन्यात उपचार सुरू
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची...शिवसेनेच्या सुनावणीत काय काय घडलं?
विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली अन्.... शिवसेनेच्या सुनावणीत आत्तापर्यंत काय काय घडलं? A टू Z माहिती
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापले
केरळम्'चे गृहमंत्री पदाचा फायदा घेतात हे... चंद्रशेखर बावनकुळे संतापलेच, नेमकं काय घडलं?
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल