AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 9 February 2025 : महागाईच्या आखाड्यात, सोने-चांदीची काय खबरबात, ग्राहकांचा खिसा कापला की दिला दिलासा?

Gold Silver Rate Today 9 February 2025 : महागाईच्या आखाड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांचा खिसा कापला की दिलासा दिला? सुट्टीच्या दिवशी मौल्यवान धातुची खरेदी करायची असेल तर अगोदर किंमत जाणून घ्या.18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशी आहे किंमत?

Gold Silver Rate Today 9 February 2025 : महागाईच्या आखाड्यात, सोने-चांदीची काय खबरबात, ग्राहकांचा खिसा कापला की दिला दिलासा?
सोने-चांदीची किंमत
| Updated on: Feb 09, 2025 | 8:36 AM
Share

दिल्लीत आपचे पानीपत झाले. भाजपाच्या सत्तेचा वारू देशभर पसरला. आता अनेक राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार आले आहेत. सोने-चांदीचे भाव सातत्याने वाढत असताना केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे. गेल्या बजेटमध्ये आयात शुल्कावर मोठी कर कपात झाली होती. या बजेटमध्ये मात्र या क्षेत्राला दिलासा मिळाला नाही. महागाईच्या आखाड्यात सोने आणि चांदीने ग्राहकांचा खिसा कापला की दिलासा दिला? सुट्टीच्या दिवशी मौल्यवान धातुची खरेदी करायची असेल तर अगोदर किंमत जाणून घ्या.18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीची अशी आहे किंमत? (Gold Silver Price Today 9 February 2025 )

सोन्याची घोडदौड

या आठवड्यात सोन्याने तुफान घोडदौड केली. सोमवारी सोने 440 रुपयांनी घसरले होते. मंगळवारी 115 रुपयांनी आणि बुधवारी 1040 रुपयांनी सोन्याने मुसंडी मारली. गुरुवारी त्यात 250 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,450 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत चढउतार

या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. 4 फेब्रुवारी रोजी चांदी 1 हजार रुपयांनी स्वस्त झाली. तर बुधवारी चांदी 1 हजारांनी वाढली. त्यानंतर भावात बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 84,699, 23 कॅरेट 84,360, 22 कॅरेट सोने 77,584 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,524 रुपये, 14 कॅरेट सोने 49,549 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 95,391 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप