AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | चांदी 76 हजारांच्या घरात, तर सोने चढले एका दमात, आता भाव काय

Gold Silver Rate Today 9 March 2024 | सोन्याने या आठवड्यात 1600 रुपयांची भरारी घेतली तर चांदीने पण जोरदार चढाई केली. सोन्याने या आठवड्यात ग्राहकांना कोणताही दिलासा दिला नाही. तर चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. आठवड्याच्या शेवटी आता भाव वधारतात की कमी होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rate Today | चांदी 76 हजारांच्या घरात, तर सोने चढले एका दमात, आता भाव काय
सोने चमकले, चांदी वधारलीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 09, 2024 | 8:26 AM
Share

नवी दिल्ली | 9 March 2024 : तर मार्च महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांच्या खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरले. डिसेंबरमध्ये सोने आणि चांदीने कहर केला होता. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मौल्यवान धातूंनी दिलासा दिला होता. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात दोन्ही धातू कमाल दाखवतील असा अंदाज खरा ठरला. या महिन्यात सोन्याने मोठी चढाई केली. सोने जवळपास 2900 रुपयांनी वधारले. तर या आठवड्यात 1600 रुपयांनी महागले. चांदीने मोठी घौडदौड केली. सोने-चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 9 March 2024)..

सोन्याची लांब उडी

मार्च महिन्यात सोन्याने कहर केला. या महिन्यात सोने जवळपास 2900 रुपयांनी वधारले. तर या आठवड्यात 1600 रुपयांनी चढाई केली. 1 मार्चपासून ते 8 मार्चपर्यंत 2890 रुपयांनी सोने महागले. 1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2100 रुपयांची वाढ

मार्च महिन्यात चांदी जवळपास तीन हजारांनी वधारली. तर या आठवड्यात चांदीत 2100 रुपयांची वाढ झाली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 64,955 रुपये, 23 कॅरेट 64,695 रुपये, 22 कॅरेट सोने 59,499 रुपये झाले.18 कॅरेट 48,716रुपये, 14 कॅरेट सोने 37,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,265 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा