AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सुवर्णनगरीत सोने ६७ हजारांच्या घरात; चांदीने ७३ हजारांचा आकडा केला पार

Gold Silver Rate Today | जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने कहर केला. सोन्याची ७० हजारांकडे वाटचाल सुरु आहे. तर चांदीने पण ७५ हजारांकडे कूच केली आहे. मार्च महिन्यात सोने आणि चांदीने मोठा पल्ला गाठला आहे. एका आठवड्यात सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Rate Today | सुवर्णनगरीत सोने ६७ हजारांच्या घरात; चांदीने ७३ हजारांचा आकडा केला पार
| Updated on: Mar 09, 2024 | 3:19 PM
Share

किशोर पाटील, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी,जळगाव | 9 March 2024 : सुवर्णनगरीत सोने आणि चांदी अगदी सूसाट आहे. सराफा बाजारात जीएसटीसह सोन्याचे दर पोहचले ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळा तर चांदीचे दर ७४ हजार प्रति किलो वर पोहोचले. एका आठवड्यात सोन्याच्या भावात २ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. या वर्षात आतापर्यंतची सोन्याच्या दरात झालेली सर्वात मोठी वाढ ठरली आहे. चांदीच्या भावातही १२०० रुपयांनी वाढ झाली. चांदीचा दर ७४ हजार प्रति किलोवर पोहोचला. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे.

आता असा आहे भाव

  1. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे आजचे ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले असून जीएसटीसह सोन्याचे दर ६७ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोने ६२ ते ६३ हजारांदरम्यान होते.अमेरिकेतील बँकिंग क्षेत्र अस्थिर झाल्याने मार्चच्या सुरुवातीला सोन्यात भाववाढ सुरू झाली.
  2. त्यामुळे ५ मार्च रोजी सोने ६४ हजार ६५० रुपयांवर पोहोचले. ६ रोजी ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झालेल्या सोन्याने ७ रोजी ६५ हजारांचा पल्ला ओलांडला व ते ६५ हजार ४०० रुपये प्रतितोळा झाले. ८ मार्च रोजी त्यात पुन्हा ३०० रुपयांची वाढ होऊन ते ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळा झाले.
  3. तर चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून फारशी वाढवते ६ मार्च रोजी ७२ हजार ८०० रुपये असलेल्या चांदीच्या दारातही दोनच दिवसात १२०० रुपये वाढ झाली. चांदीचे दर ७४ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही भाव ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
  4. ऐन लग्न सराईंचे दिवस आहे, यातच सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. तर सोन्याचे दर वाढल्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे बजेट मात्र कोलमडले आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल