AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसबीआय ग्राहकांसाठी चांगली बातमी ! आता घरबसल्या बदलू शकता बँक शाखा

कोरोना महामारीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने ही सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत आपले एसबीआय खाते एका शाखेतून दुसर्‍या शाखेत सहजपणे हस्तांतरीत केले जाऊ शकते. यासाठी बँकेत जाऊन अर्ज देण्याची गरज भासणार नाही. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)

एसबीआय ग्राहकांसाठी चांगली बातमी ! आता घरबसल्या बदलू शकता बँक शाखा
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Edited By: Anish Bendre | Updated on: May 10, 2021 | 8:25 AM
Share

नवी दिल्ली : कोरोना काळात लोकांना बँकेत पायपीट करावी लागू नये म्हणून बँका आता ऑनलाईन सुविधांमध्ये वाढ करीत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांना दिलासा देत बँक शाखा बदलण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आता ग्राहक सहजपणे घरी बसून त्यांची एसबीआय बँक शाखा (Transfer Bank Account) सहज बदलू शकतात. यासाठी त्यांना काही प्रक्रिया पाळाव्या लागतील. कोरोना महामारीमध्ये ग्राहकांच्या सोयीसाठी एसबीआयने ही सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत आपले एसबीआय खाते एका शाखेतून दुसर्‍या शाखेत सहजपणे हस्तांतरीत केले जाऊ शकते. यासाठी बँकेत जाऊन अर्ज देण्याची गरज भासणार नाही. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)

या प्रक्रियेद्वारे करा बँक खाते हस्तांतरीत

1. शाखा बदलण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला Onlinesbi.com भेट द्या. येथे आपला आयडी-पासवर्ड प्रविष्ट करुन लॉग इन करा. 2. आता ‘पर्सनल बँकिंग’ पर्याय निवडा आणि वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड प्रविष्ट करा. 3. ई-सेवा टॅबवर येथे क्लिक करा. यानंतर ट्रान्सफर सेव्हिंग अकाऊंटवर क्लिक करा. 4. आपले खाते येथे निवडा जे आपण हस्तांतरीत करू इच्छित आहात. याशिवाय ज्या शाखेमध्ये तुम्हाला तुमचे खाते हस्तांतरीत करायचे आहे त्या शाखेचा आयएफएससी कोड प्रविष्ट करा. 5. सर्व तपशील तपासल्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ते भरून पुष्टी करा. 6. या प्रक्रियेद्वारे तुमची विनंती इतर बँक शाखेत पोहोचेल. ते मान्य होताच शाखा हस्तांतरणाची माहिती आपल्या नोंदणीकृत क्रमांकावर बँकेमार्फत दिली जाईल. 7. आपणास पाहिजे असल्यास आपण योनो एसबीआय आणि योनो लाईट अ‍ॅपद्वारे आपली बँक शाखा देखील बदलू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे. (Good news for SBI customers! Now you can change bank branches at home)

इतर बातम्या

तिसऱ्या लाटेपूर्वीच पुण्यात लहान मुलांना कोरोना संसर्ग! 1 वर्षाखालील 249 चिमुकल्यांना कोरोनाची लागण

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांबाबत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली