AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

७.८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या महिन्यापासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार

ईपीएफओ ( EPFO ) कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे. येत्या जानेवारीपासून आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफचे पैसे आता एटीएममधून काढता येणार आहेत. चला पाहूयात काय आहे योजना.

७.८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, या महिन्यापासून एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार
| Updated on: Oct 08, 2025 | 10:04 PM
Share

ATM withdrawal: कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) मेंबरसाठी एक महत्वाची घडामोड घडत आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) जानेवारी २०२६ पासून एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा सुरु करु शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार EPFO चा सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था CBT ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या आपल्या बोर्ड बैठकीत एटीएममधून पैसे काढण्याची सुविधेला मंजूरी देऊ शकते.

ऑनलाईन क्लेम जमा करण्याची गरज नाही

एटीएममधून पैसे काढण्याच्या सुविधेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना पैसे काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम जमा करण्याची आता काहीही गरज लागणार नाही.यामुळे खूप काळ प्रतिक्षा पाहण्याची आता वाट पाहावी लागणार नाही. कर्मचारी एकदम सहजपणे कोणत्याही एटीएम ब्रँचमध्ये जाऊन आता आपल्या पीएफचे पैसे काढू शकणार आहे.

मंत्रालय करत आहे आरबीआयशी बोलणी

श्रम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की मंत्रालयाने बँकांसह आरबीआयशी देखील ईपीएफओ एटीएम सुविधा सुरु करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएम सुविधेला एका गरज म्हणून पाहिले जात आहे. कारण सरकार लोकांना त्यांच्या पीएफ खात्यापर्यंत पोहचण्यास मदत करु इच्छीत आहे.

ईपीएफओजवळ आहेत २८ लाख कोटी रुपये

सध्या ईपीएफओ अंतर्गत ७.८ कोटी रजिस्टर्ड मेंबर्स आहेत.ज्यांनी एकूण २८ लाख कोटी रुपयांहून अधिक पैसा यात जमा केला आहे. साल २०१४ मध्ये ३.३ कोटी सदस्यांनी एकूण ७.४ लाख कोटी रुपये ईपीएफओमध्ये जमा केले होते.

पीएफमधून पैसे काढण्यासाठी कार्ड जारी होणार

सूत्रांनी सांगितले की ईपीएफओ आता त्यांच्या सदस्यांसाठी एक विशेष कार्ड जारी करु शकते. ज्यामुळे ते एटीएममधून आपले पैशांचा काही भाग काढू शकतात. या वर्षीच्या सुरुवातीला ईपीएफओने ग्राहकांसाठी पैसे काढण्यासाठी एक सुविधा उपलब्ध केली होती. ईपीएफओने ग्राहकांसाठी निधीची उपलब्धता सुलभ करण्यासाठी स्वयंचलित दाव्याच्या निपटाऱ्याची रक्कम १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली होती. या प्रक्रियेअंतर्गत, दाव्यांच्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी एक स्वयंचलित प्रणाली डिजिटल तपासणी आणि अल्गोरिदमचा संच वापरते. ही संपूर्ण प्रक्रिया प्रणाली-चालित आहे आणि सदस्याच्या केवायसी तपशीलांवर आधारित आहे.

विशेष तज्ज्ञांच्या मते एटीएमच्याद्वारे ईपीएफओचे पैसे काढण्याची अनुमती देण्यात आल्याने सदस्यांना त्यांचे पैसे त्यांना हवे तेव्हा काढता येणार आहेत. खासकरुन आपात्कालिक स्थितीत हे पैसे कामी येतील. कारण वर्तमान काळात हे पैसे काढण्यासाठी मोठी कागदपत्रांची प्रक्रिया पार पाडावी लागते.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.