AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

८ व्या वेतन आयोगाने पुन्हा आशा जागविली, २०२६ पासून वेतनात होऊ शकते इतकी वाढ

आठव्या वेतन आयोगाच्या बातमीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या आयोगाचील संपूर्ण अंमलबजावणी २०२८ पर्यंत होऊ शकते, परंतु त्याचा परिणाम खूप आधीच जाणवायला सुरु होणार आहे.

८ व्या वेतन आयोगाने पुन्हा आशा जागविली, २०२६ पासून वेतनात होऊ शकते इतकी वाढ
| Updated on: Oct 04, 2025 | 9:40 PM
Share

८ व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील बातम्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या संदर्भात लाभ पदरी पडण्यासाठी २०२८ उजाडणार आहे. परंतू याचा परिणाम आधी पासूनच जाणवायला लागणार आहे. अंदाजानुसार देशाच्या सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि सुमारे ६५ लाख पेन्शनधारी या आयोगाचे लाभार्थी होणार आहेत.बातमीनुसार १ जानेवारी २०२६ पासून या वेतन सुधाराला आधारभूत मानले जाईल आणि याच तारखेपासून कर्मचाऱ्यांना नवीन सॅलरीनुसार पैसे मिळायला सुरुवात होईल.

वेतन आयोगाचा सर्वात महत्वाचा मुद्दा फिटमेंट फॅक्टर आहे. जो सध्याच्या वेतनाच्या एक गुणांकाने वाढतो. यामुळे बेसिक वेतनाचा नवीन आकडा निश्चित होतो. गेल्या सातव्या वेतन आयोगाच्या वेळी हा फॅक्टर २.५७ होता.ज्यामुळे किमान बेसिक वेतन ७००० रुपयांवरुन थेट १८, ००० रुपयांपर्यंत पोहचले होते. या वेळी विविध बातम्यांमध्ये फिटमेंट फॅक्टरबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. कोणी १.९२ तर कोणी २.८६ चा अंदज लावत आहे. परंतू तज्ज्ञांच्या मते यंदा सुमारे २.४६ चा फिटमेंट फॅक्टर लागू होऊ शकतो

महागाई भत्ता आता मूळ वेतनात सामील ?

यंदा एक खास बदल हा ही होऊ शकतो की महागाई भत्ता थेट बेसिक वेतनात मर्ज होऊ शकतो. याचा अर्थ हा होईल की महागाई वाढल्यानंतर स्वतंत्र भत्ता देण्याऐवजी वेतनात वाढ होईल. यामुळे वेतना वाढीचा परिणाम अधिक जास्त होईल. आणि फिटमेंट फॅक्टरला महत्व असणार हे ही खरे मानले जात आहे.

नवीन वेतनाने किती होईल फायदा?

जर आपण २.४६ फिटमेंट फॅक्टरला आधार मानला तर वर्तमानात जे किमान बेसिक वेतन १८,००० रुपये आहे ते वाढून सुमारे ४४,००० रुपये होईल. हे लेव्हल-१ कर्मचाऱ्यांसाठी नवीन बेसिक वेतन असेल. यात महागाई भत्त्याची रक्कम समाविष्ठ नसेल. परंतू हाऊस रेंट अलाऊन्स (HRA) स्वतंत्रपणे शहराहून मिळेल.

नव्या वेतनाचा हिशेब

सोप्या भाषेत म्हणायचे तर जुन्या बेसिक वेतनाला २.४६ ने गुणाकार करुन ८ व्या वेतन आयोगाचे नवीन वेतन मिळेल. त्यामुळे लेव्हल-१ ते लेव्हर -१८ पर्यंतच्या सर्व कर्मचारी प्रभावित होतील. यामुळे केवळ पगारात वाढ होईल असे नव्हे तर सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.