इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला प्रचंड प्रतिसाद,1.15 लाख कोटीच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव,रोजगाराच्या संधी निर्माण होणार
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग योजनेने भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीमने भारतातील इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे पुनरुज्जीवन केले आहे. सरकारला यामुळे विश्वास आहे की यामुळे केवळ गुंतवणूकच आकर्षित होईल असे नव्हे तर रोजगारालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. ECMS ला आतापर्यंत १.१५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले आहेत.
भारतात इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक कंपोनन्ट मॅन्युफॅक्चरिंग स्कीमला(ईसीएमएस) १.१५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळाले आहेत. हा आकडा योजनेच्या सुरुवातीच्या लक्ष्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि यावरुन स्पष्ट होते की मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माण होणार आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स तसेच आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली की या योजनेंतर्गत गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगाराचे जे लक्ष्य ठरवले होते त्याहून अधिक जादा प्रस्ताव प्राप्त झाले आहे. त्यांनी सांगितले की अर्जाची प्रक्रीया ३० सप्टेंबर रोजी बंद झाली आणि तोपर्यंत १,१५,३५१ कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव सरकारला मिळाले आहेत.
लक्ष्यापेक्षा दुप्पट जास्त गुंतवणूक
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष दिल्याने गेल्या ११ वर्षात जो विश्वास विकसित केला आहे. तो आज गुंतवणूक, उत्पादन आणि रोजगारात बदलत आहे असे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले. आम्ही ५९,३५० कोटी रुपयांचे एक अत्यंत महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले होते. आणि प्रत्यक्षात आम्हाला १,१५,३५१ कोटी रुपयांचे अर्ज मिळाले आहे. ४,५६,५०० कोटी रुपयांच्या उत्पादनाच्या लक्ष्याच्या तुलनेत आम्हाला १०,३४,००० कोटी रुपयांहून अधिक उत्पादनाचा अंदाज मिळाला आहे.जो आमच्या लक्ष्यापेक्षा दुपटीहून जास्त आहे.
रोजगार आणि आत्मनिर्भरताचा नवा मार्ग
या प्रस्तावांमुळे केवळ गुंतवणूकच नाही तर रोजगाराच्या मोठ्या संधी खुल्या होती. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आम्ही ९१,६०० लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.प्रत्यक्षात अपेक्षित रोजगार दीड पट म्हणजे १,४१,००० लोकांना रोजगार मिळणार आहे.
देशातील छोट्या उद्योगांनी दाखवला जम
या योजनेची सर्वात महत्वाची बाब म्हणजे सुमारे ६० टक्के अर्ज देशातील छोटे आणि मध्यम उद्योगांतून (MSME) आले आहेत. याचा अर्थ आता सर्वात छोटे उद्योग देखील इलेक्ट्रॉनिक निर्मितीत मोठ्या खेळाडू सोबत खांद्याला खांदा लावून पुढे येत आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की अनेक कंपन्यांनी डिझाईनची टीम तयार केल्या आहेत. आणि नव्या क्षेत्रात गुंतवणूकीची योजना तयार केले आहे. पहिल्यांदा देशात एसएमडी पॅसिव्ह, फ्लेक्सिबल पीसीबी,लॅमिनेट आणि भांडवली उपकरण सारख्या क्षेत्रात देखील उत्पादन होणार आहे.
