AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैशांची गुंतवणूक करायची तर, या सरकारी योजना अगोदर पाहा…

जर तुम्हाला पैसाची गुंतवणूक कारायची असेल मात्र, कुढल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल, तर भारत सरकारच्या बर्‍याच बचत योजना आहेत,

पैशांची गुंतवणूक करायची तर, या सरकारी योजना अगोदर पाहा...
| Updated on: Dec 14, 2020 | 11:23 AM
Share

मुंबई : जर तुम्हाला पैसाची गुंतवणूक कारायची असेल मात्र, कुढल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नसेल, तर भारत सरकारच्या बर्‍याच बचत योजना आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करु शकता. सरकार वेळोवेळी या बचत योजनांचे व्याज दर बदलत राहते. या बचत योजनांना वार्षिक 4 टक्के ते 7.6 टक्के व्याज मिळते. या योजनांमधील गुंतवणूकीवर हमी उत्पन्न मिळू शकेल.(Government of India has many savings schemes in which you can invest)

पोस्ट ऑफिस सेव्हिंग खाते पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात जुना आणि सुरक्षित पर्याय आहे. येथे आपण बचत खाते फक्त 500 रुपयांमध्ये उघडू शकता, हे खाते अगदी बँक बचत खात्यांसारखे आहे. परंतु या योजनेतील गुंतवणूकीवर वर्षाकाठी 4% व्याज दिले जाते. याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ठेव खातीही उघडता येतात. ज्यामध्ये आपण 1, 2, 3 आणि 5 वर्षे गुंतवणूक करू शकतो. एक ते तीन वर्षांसाठी तुम्हाला गुंतवणूकीवर 5.5 टक्के आणि पाच वर्षांसाठी 6.7 टक्के रक्कम मिळेल.

5 वर्षांपासून पोस्ट ऑफिसमध्ये (RD) पोस्ट ऑफिसमध्ये करिंग ठेवीवर आपल्याला अधिक व्याज देखील मिळू शकते. पोस्ट ऑफिस या योजनेत 5.8 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत पती-पत्नी एकत्रितपणे 30 लाख रुपयांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यात 5 वर्षांचे लॉक-इन असते आणि त्यास वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळते.

नेशनल सेविंग्स सर्टिफिकेट (NSC) पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट (एनएससी) वर सध्या 6.8 टक्के व्याज मिळत आहे. त्यामध्ये केलेल्या गुंतवणूकीवर आयकर कलम 80 सी अंतर्गत कराची सूट देखील मिळते. त्यात केलेल्या गुंतवणूकीवर 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो. जर आपत्कालीन परिस्थितीत एनएससीला तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेता जाऊ येते.

पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) पीपीएफ ही भारतातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे, त्यामध्ये केलेली गुंतवणूक 15 वर्षांत पूर्ण होते. पीपीएफ गुंतवणूकीचा कालावधी 5 वर्षांचा आहे. तुम्ही पीपीएफ खात्यात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सध्या 7.1 टक्के परतावा मिळत आहे. पीपीएफ खाती कोठेही बँका किंवा टपाल कार्यालये उघडता येतील.

किसान विकास पत्र (KVP) भारतीय ग्रामीण परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने किसान विकास पत्र योजना सुरू केली. किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये देऊन खाते उघडता येते. सध्या हे वार्षिक परतावा 6.9 टक्के मिळत आहे. किसान विकास पत्रात गुंतवणूक केलेली रक्कम 124 महिन्यांत दुप्पट होते. कोणत्याही टपाल कार्यालयात जाऊन फॉर्म भरून आपण खाते उघडू शकता. फॉर्म ऑनलाईन डाऊनलोड देखील करता येतो.

सुकन्या समृद्धि योजना जर आपल्या मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर आपण सुकन्या समृद्धि योजनेत मुलीच्या नावावर गुंतवणूक करू शकता. या योजनेवर सध्या 7.6 टक्के व्याज प्राप्त होत आहे. या योजनेत एखादी व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत ही रक्कम 9 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होते.

संबंधित बातम्या : 

दरवर्षी PF वरील व्याजाचा दर बदलतो, यंदा कधी आणि किती व्याज मिळणार? वाचा…

आता RTGS चा नियम बदलला, घरात बसून 24 तास करा पैशांचे व्यवहार

(Government of India has many savings schemes in which you can invest)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.