AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, उत्पादन शुल्कात कपात, इंधन होणार स्वस्त ?

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, जागतिक तेल बाजारात अलीकडेच मंदी आली असली तरी, सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात लक्षणीय कपात केली आहे, ज्यामुळे इंधनाच्या किमती कमी होण्याचा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय, उत्पादन शुल्कात कपात,  इंधन होणार स्वस्त ?
पेट्रोल-डिझेल
| Updated on: Mar 27, 2026 | 11:24 AM
Share

मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (excise duty ) कमी केलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये करण्यात आलं आहे. तर, डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पेट्रोलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क पूर्वीच्या 13 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 3 रुपये प्रति लिटर झालं आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्वीच्या 10 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 0 करण्यात आले आहे.

नायराने वाढवले होते दर

गेल्या गुरूवारी देशातील सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या नायरा एनर्जीने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले होते. नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ जाहीर केल्यानंतर, सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी केलं आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत पडला फरक

पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या.  मात्र, इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर, शुक्रवारी सकाळच्या सत्रात किमती किंचित घसरल्या. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्रेंट क्रूड 0.8.८% ने घसरून प्रति बॅरल 107.11 १ डॉलरवर आले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) 0.88 % ने घसरून प्रति बॅरल 93.65 डॉलरवर आले. आदल्या दिवशी या दोन्ही तेलांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली होती.

गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झालं आणि तणाव वाढला, प्रत्युत्तरादाखल, इराणने इस्रायल आणि आखाती देशांना लक्ष्य केले, जिथे अमेरिकेचे लष्करी तळ होते. इराण आणि लेबनॉनमधील हल्ल्यांमध्ये आतापर्यंत हजारो लोक मारले गेले आहेत. या युद्धामुळे तेलपुरवठा विस्कळीत झाला असून, किमती वाढल्या आहेत आणि जगभरातील बाजारपेठांवर परिणाम झाला आहे.

निर्मला सीतरमण यांचं ट्विट

दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही यासंदर्भात एक महत्वाचं ट्विट केलं आहे.

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, घरगुती वापरासाठीच्या पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रत्येकी 10 रुपयांनी (प्रति लिटर) कमी करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना भाववाढीपासून संरक्षण मिळेल. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि किमतींपासून संरक्षण मिळावे, हे माननीय पंतप्रधान @narendramodi यांनी नेहमीच हे सुनिश्चित केलं आहे.

याशिवाय, डिझेलच्या निर्यातीवर प्रति लिटर ₹21.5 रुपये आणि ATFवर प्रति लिटर 29.5 रुपये दराने शुल्क आकारण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. याबाबत संसदेला अधिसूचित करण्यात आले आहे, असं त्यांनी नमूद केलं.

Follow Us
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?