AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GST COLLECTION: जीएसटीचं रेकॉर्डब्रेक कलेक्शन, 1.40 लाख कोटींचा टप्पा पार

आतापर्यंतचे सर्वाधिक 1,42,095 लाख कोटी रुपयांचे संकलन झाल्याची माहिती अर्थविभागाने दिली आहे. एक महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे संकलन 1,40,986 कोटी रुपयांवर पोहोचले होते.

GST COLLECTION: जीएसटीचं रेकॉर्डब्रेक कलेक्शन, 1.40 लाख कोटींचा टप्पा पार
Image Credit source: social
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 8:27 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या गोटातून आर्थिक धोरणातील बदलाचे (NEW ECONOMIC POLICY) संकेत मिळत आहे. दरम्यान, गेल्या मार्च महिन्यात जीएसटीच्या संकलनाची रेकॉर्डब्रेक कामगिरी समोर आली आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक 1,42,095 लाख कोटी रुपयांचे संकलन झाल्याची माहिती अर्थविभागाने दिली आहे. एक महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जीएसटीचे संकलन 1,40,986 कोटी रुपयांवर पोहोचले होते. मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,42,095 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये केंद्रीय जीएसटीचा (CENTRAL GST) वाटा 25,830 कोटी रुपये आहे. तर राज्य कराचा (STATE GST) वाटा 32378 कोटी आणि एकात्मिक कराचा वाटा (IGST) 9417 कोटी इतका आहे. मार्च महिन्यातील जीएसटीचे संकलन गेल्या महिन्याच्या तुलनेत 15 टक्क्यांहून अधिक आहे. जीएसटी परिषदेने हाती घेतलेल्या विविध उपायांमुळे जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे अर्थविभागानं म्हटलं आहे.

जीएसटीवरुन केंद्र विरुद्ध राज्य:

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी तर 17 राज्यांना पत्र लिहून केंद्रावर दबाव आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत या विषयाला गती मिळण्याची दाट शक्यता आहे. तर चिंता फक्त सरकारलाच करावी लागणार आहे असे नाही. तर नागरिकांनाही करावी लागणार आहे, कारण केंद्राने हात काढल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी राज्य सरकार अनेक वस्तूंवर जीएसटी वाढवू शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

टप्पे कमी, किंमत जास्त

केंद्र सरकार जीएसटीत सुधारणा करण्याच्या मनस्थितीत आहे. जीएसटी टप्प्यात घट केल्यास त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. कर टप्पा कमी करुन महसूलात वाढ करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सुधारीत रचनेनुसार, सध्या सर्वात कमी कर टप्पा 6 टक्क्यांचा असण्याची शक्यता आहे.

एक देश, एक कर:

भारतात वस्तू व सेवा कर 01 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला. संपूर्ण देशभरात एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. संपूर्ण देशभरात एकसमान करप्रणाली असावी हा उद्देश जीएसटीच्या अंमलबजावणीच्या मागे होता. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर (INDIRECT TAX) रद्द करून जीएसटी करप्रणाली भारतात लागू करण्यात आली. जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेत घटनादुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले.

संबंधित बातम्या :

…गृह कर्ज घेतायं?, प्रक्रिया ते फोरक्लोजर शुल्क, जाणून घ्या-सर्व एकाच क्लिकमध्ये

गुढी उत्साहाची, निर्बंधमुक्तीची… राज्यात सोने खरेदीचा उत्साह, वाचा Gold Price Today!

नव्या आर्थिक वर्षात सरकारला ‘करा’तून प्राप्ती ! तर नागरिकांना नियमांची धास्ती

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.