घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीत कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांपूर्वी घर खरेदीदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. शिवाय सवलतीच्या घरांवरील जीएसटी हा 8 टक्क्यांवरुन एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली. बांधकाम …

घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटीत कपात

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकांपूर्वी घर खरेदीदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांवर आणला आहे. शिवाय सवलतीच्या घरांवरील जीएसटी हा 8 टक्क्यांवरुन एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली.

बांधकाम सुरु असलेल्या आणि सवलतीच्या घरांवरील जीएसटीत कपात करण्यासोबतच सिमेंटच्या दरातही कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या बुधवारी झालेल्या बैठकित जेटलींनी यावरील निर्णय पुढे ढकलला होता. रविवारी यावर जीएसटी परिषद विचार करेल अशी माहिती जेटलींनी दिली होती.

जीएसटीत कपात करण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी हे नवे बदल करण्यात आले आहेत.यामुळे जास्तीतजास्त लोकांना याचा फायदा होमार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे”, असं जेटलींनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *