एचडीएफसी बँकेचं मोबाईल अॅप बंद

एचडीएफसी बँकेचं मोबाईल अॅप बंद

नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेने आपलं मोबाईल अॅप गुगल प्ले आणि अॅपलच्या स्टोअरमधून काढलं आहे. यामुळे ग्राहक पुन्हा पहिल्यासारखे नेट बँकिंग, फोन बँकिंग, पेजअॅप, मिस्ड कॉल बँकिंगचा वापर एचडीएफसीच्या अधिकृत वेबसाईटवरुन करत आहेत. काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेने नवीन मोबाईल बँकिंग अॅप लाँच केला होता. अॅपचे नवीन व्हर्जन आल्यापासून बऱ्याच युजर्सचे अकाउंट लॉगईन होत नव्हते. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:55 PM

नवी दिल्ली : एचडीएफसी (HDFC) बँकेने आपलं मोबाईल अॅप गुगल प्ले आणि अॅपलच्या स्टोअरमधून काढलं आहे. यामुळे ग्राहक पुन्हा पहिल्यासारखे नेट बँकिंग, फोन बँकिंग, पेजअॅप, मिस्ड कॉल बँकिंगचा वापर एचडीएफसीच्या अधिकृत वेबसाईटवरुन करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एचडीएफसी बँकेने नवीन मोबाईल बँकिंग अॅप लाँच केला होता. अॅपचे नवीन व्हर्जन आल्यापासून बऱ्याच युजर्सचे अकाउंट लॉगईन होत नव्हते. लाँच झाल्यापासून अॅपमध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्याचे दिसत होते. अॅप ओपन केला तर त्यामध्ये एक मेसेज दिसतो, माफ करा, आमच्या सर्वरवर खूप ट्रॅफिक आहे, कृपया थोड्यावेळाने पुन्हा प्रयत्न करा. यामुळे बऱ्याच ग्राहकांनी अॅप मोबाईलमधून काढून टाकला आहे.

ग्राहकांना होणारा सततचा त्रास पाहता एचडीएफसीने बँकेचं अॅप हटवण्याचा निर्णय घेतला. तसेच ट्विटरवर ग्राहकांची क्षमाही मागितली. नवीन अॅप कधी लाँच होईल याची माहिती बँकेने अजून दिलेली नाही.

सध्याच्या डिजीटल युगात सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. बँकांचीही बरीच कामं ऑनलाईन होत असल्याने, प्रत्येक बँकेचं स्वतंत्र अॅप आहे. अॅप बंद झाल्यामुळे ग्राहकांना खूप कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावरही ग्राहक तक्रार करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें