AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC की Axis बँक, 3 वर्षांसाठी 3 लाखांचे पर्सनल लोन कोणाचं स्वस्त ? घ्या जाणून

तुम्हीही बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर ज्या बँकेत तुम्हाला सर्वात कमी व्याजदराने कर्ज मिळेल अशा बँकेकडून पर्सनल लोन घ्यावे. आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक पर्सनल लोनबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया कोणत्या बँकेतून पर्सनल लोन घेणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

HDFC की Axis बँक, 3 वर्षांसाठी 3 लाखांचे पर्सनल लोन कोणाचं स्वस्त ? घ्या जाणून
पर्सनल लोनImage Credit source: TV9 Telugu
| Edited By: | Updated on: Mar 13, 2025 | 3:15 PM
Share

पैशाची गरज कुणालाही केव्हाही भासू शकते. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने आपत्कालीन निधी ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच काही पैसेही गुंतवावेत, जेणेकरून कठीण काळात पैशांची सहज व्यवस्था करता येईल, पण काही लोक तसे करत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना कठीण काळात पैशांची व्यवस्था करणे खूप कठीण जाते. काही लोक या परिस्थितीत बँकेकडून पर्सनल लोन घेऊनही आपल्या गरजा पूर्ण करतात. याविषयी पुढे जाणून घ्या.

तुम्हीही बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर ज्या बँकेत तुम्हाला सर्वात कमी व्याजदराने कर्ज मिळेल अशा बँकेकडून पर्सनल लोन घ्यावे. आम्ही तुम्हाला एचडीएफसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक पर्सनल लोनबद्दल सांगणार आहोत. जाणून घेऊया कोणत्या बँकेतून पर्सनल लोन घेणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.

एचडीएफसी बँकेचा 3 लाखांवर EMI किती ?

एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 10.85 टक्के व्याजदराने पर्सनल लोन सहज मिळेल. जर तुम्ही 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 लाखांचे पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला दरमहा 9,800 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. या प्रकरणात तुम्ही संपूर्ण 52,811 रुपये फक्त व्याज म्हणून भराल.

अ‍ॅक्सिस बँकेचा 3 लाखांवर EMI किती?

अ‍ॅक्सिस बँक ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला 11.25 टक्के व्याजदराने पर्सनल लोन सहज मिळेल. जर तुम्ही 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 लाखांचे पर्सनल लोन घेत असाल तर तुम्हाला दरमहा 9,857 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील. अशा परिस्थितीत तुम्ही संपूर्ण 54,858 रुपये फक्त व्याज म्हणून भराल.

व्याजावरील कर वजावट

पर्सनल लोनवर डायरेक्ट टॅक्समध्ये सूट नाही, पण जर त्याचा वापर विशिष्ट कारणांसाठी केला गेला तर तुम्ही व्याजावर टॅक्स वजावट मिळवू शकता. जर तुम्ही घर खरेदी किंवा बांधण्यासाठी पर्सनल लोनचा वापर करत असाल तर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80 C अंतर्गत 1.5 लाख रुपयांच्या मूळ रकमेवर करसवलत मिळू शकते. ही सवलत एका आर्थिक वर्षासाठी घेता येईल.

पर्सनल लोनचा वापर सेल्फ ऑक्युपेटेड म्हणजेच सेल्फ युज्ड घरासाठी केला गेला असेल तर. अशावेळी तुम्ही व्याजावर 2 लाखांपर्यंत सूट घेऊ शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...