नवी दिल्ली : गृहवित्त पुरवठा करणाऱ्या अग्रणी एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे. एचडीएफसीने आरपीएलआरमध्ये (रिटेल प्राईम लेडिंर रेट) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या दरात 5 बेसिस पॉईंटची (Basis point) वाढ नोंदविली गेली आहे. दरम्यान, नव्या ग्राहकांवर बदल लागू नसणार नाही. एचडीएफसीच्या केवळ जुन्या ग्राहकांसाठी सुधारित बदल लागू असणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve bank of India) व्याज दरात जैसे थे धोरण स्विकारल्यामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये लेंडिग रेट वाढीची चर्चा सरू होती. त्यामुळे एचडीएफसीने दीर्घकाळानंतर लेडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. एचडीएफसी नंतर अन्य बँकाही प्राईम लेंडिंग रेट (Prime lending rate) मध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या घराचं स्वप्न साकार करू पाहणाऱ्या ग्राहकांना गृहकर्जासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.