AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय

काही कागदपत्रांची पुर्तता केली. उत्पन्नाचा दाखला दिला. बँकेला सर्व गोष्टी पटल्यावर तुम्हाला गृहकर्ज मंजुरीसाठी मोठी कसरत करावी लागत नाही. एका प्रक्रियेतंर्गत गृहकर्ज मिळते. पण खरी कसरत असते ते झटपट फेडण्यात. तुम्ही वेळेच्या आत कर्ज फेडून मोठा पैसा वाचवू शकता.

Home Loan: 20 वर्षांचे गृहकर्ज 11 वर्षांतच फेडा; 30 लाख झटक्यात वाचवा, तज्ज्ञांनी सांगितला एक नंबर उपाय
गृहकर्जाची परतफेड
| Updated on: Nov 21, 2025 | 5:26 PM
Share

How to Finish Home loan: गृहकर्ज घेणे सोपे आहे. पण ते फेडणे अडचणीसारखे आहे. कारण एक भली मोठी रक्कम दरमहा तुमच्या खात्यातून वळती होते. पण तुम्ही जर काही बदल केला आणि ईएमआयबाबत (EMI) प्रयोग केला तर व्याजाचा बोजा कमी होईल. त्यासाठी तुम्हाला बँक बदलण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुमचे कर्ज झटपट फेडल्या जाईल. 20 वर्षांचे गृहकर्ज तुम्हाला 11 वर्षांतच फेडता येईल. तुमची मोठी रक्कम वाचेल. मोठी बचत होईल. ती रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवल्यास अजून मोठा परतावा मिळेल.

ही पद्धत ठरले फायद्याची

ईटीमधील वृत्तानुसार, करतज्ज्ञ सुजीत बांगर यांनी एक उदाहरण दिलं. त्यानुसार, 60 लाख रुपयांच्या कर्जाची लवकर परतफेड करून 30.6 लाखांपेक्षा जास्त व्याजाची रक्कम वाचवली गेली. आर्थिक शिस्त, वाढीव EMI आणि अनावश्यक अॅड-ऑन टाळून त्या व्यक्तीने कर्जाची लवकर परतफेड केल्याचे बांगर यांनी सांगितले. या व्यक्तीने 20 वर्षांसाठी 9% व्याजाने 60 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सामान्यपणे पहिले 10 वर्षे हे व्याजाची रक्कम भरण्यातच जातात. 120 ईएमआय भरल्यानंतरही कर्जाचे 42.6 लाख रुपये राहतात. म्हणजे सुरुवातीला व्याजाची अधिक रक्कम तर मुळ रक्कम कमी जमा होते.

अतिरिक्त EMI ची जादू

कर्जाची परतफेड करण्यासाठी हा जादू तुम्ही पण अनुभवा. त्यासाठी दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरा. ज्या महिन्यापासून तुमचा ईएमआयला सुरुवात झाली. त्यामहिन्यात एक अतिरिक्त हप्ता बँकेत जमा करा. अशामुळे त्या व्यक्तीच्या कर्जाचे 44 हप्ते, म्हणजे महिने कमी झाले. त्याने 14.85 लाखांचे व्याज वाचवले. वर्षाला एका अतिरिक्त ईएमआयचा हा फायदा आहे. जर तुम्ही वर्षातून दोन ईएमआय अतिरिक्त भराल. तर पाच वर्षात 10 महिने, म्हणजे हप्ते कमी होईल. त्यावरील व्याजाची अतिरिक्त रक्कम कमी होईल. कर्ज झटपट फेडण्यातही मदत होईल. यासाठी आर्थिक शिस्त, नियोजन करावे लागले. 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांचा EMI द्यावा लागेल. त्यासाठी प्रत्येक महिन्याला काही रक्कम मागे टाका आणि जादू बघा.

स्टेप-अप EMI तर लाखोंची करेल बचत

तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा पगार वाढला. तर जी फरकाची रक्कम आहे, ती बचत करून वर्षाकाठी तुम्ही अतिरिक्त ईएमआय भरू शकता. अथवा तुमचा EMI दरवर्षी 5% नी वाढवा. त्याला स्टेप-अप ईएमआय असे म्हणतात. म्हणजे पगार वाढला. अथवा तुम्ही काही पार्ट टाईम काम करून कमाई करत असाल. एखादा वडिलोपार्जीत संपत्ती मिळाली अशावेळी ईएमआय वाढवण्यावर अथवा अतिरिक्त ईएमआय जमा करण्यावर भर द्या. जर तुम्ही या दोन्ही पद्धती अवलंबल्या तर म्हणजे अतिरिक्त ईएमआय अधिक वार्षिक ईएमआय वाढवला तर 20 वर्षांचे कर्ज हे जवळपास 11 वर्षांमध्ये संपेल. त्यामुळे 30.61 लाखांची बचत होईल.

टर्म विमा जर बँक माथी मारेल असेल तर त्याचा ईएमआय ऐवजी एकरक्कमी हप्ता जमा करा. त्यामुळे विम्याची दरमहा रक्कम कमी होईल. कमाईचा एखादा सोपा उपाय शोधता आला तरी तो आजमावा. ही रक्कम तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवा. त्यातून एक मोठी रक्कम पुढील 20 वर्षांत तयार होईल आणि घराच्या कर्जासाठी खर्ची पडलेली रक्कम या माध्यमातून उभारण्यास मदत होईल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.