AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Update : सोने-चांदी अजून किती विक्रम करणार, आता गुंतवणूक धोक्याची की मोक्याची

Gold Silver Price Update : गुंतवणूकदारांचं सोडा पण खरेदीदारांच्या सोने आणि चांदीने तोंडचे पाणी पळवले आहे. अचानक सोने-चांदी का झरझर चढले याचा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. आता पुढे गुंतवणूक धोक्याची आहे की मोक्याची? आजचा भाव किती आहे

Gold Silver Price Update : सोने-चांदी अजून किती विक्रम करणार, आता गुंतवणूक धोक्याची की मोक्याची
मोका की धोका
| Updated on: Apr 08, 2023 | 9:28 AM
Share

नवी दिल्ली : सोन्याने केवळ भारतीय सराफा बाजारातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मुसंडी मारली आहे. चांदीने पण सगळीकडे आगळीक केली आहे. जागतिक घडामोडींचा मोठा परिणाम दिसून येत आहे. एकीकडे कच्चा तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. तर सोने-चांदीने (Gold Silver Price Update)महागाईचा झेंडा फडकवला आहे. निर्देशांकात डॉलरला (Dollar Index) दम लागल्याने महागाईचा भडका उडाला आहे. डॉलर विरोधात रशिया, चीन आणि भारतानेही मोहिम उघडली आहे. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती भडकल्या आहेत. मग आता गुंतवणूक धोक्याची आहे की मोक्याची? आजचा भाव किती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव डॉलरने मान टाकली. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन केंद्रीय बँकेने व्याजदर वाढवला आहे. देशातील बाजारात सोन्याने 61,180 रुपये तोळ्याचा टप्पा ओलांडला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात आठवडाभरात सोन्याने 2 टक्क्यांची उसळी घेतली. सोने सध्या 2000 डॉलर प्रति औंसवर किंमती स्थिरावल्या आहेत.

वायदे बाजारात काय भाव कच्चा तेलाने महागाईची अगोदरच वर्दी दिली आहे. एकीकडे डॉलर इंडेक्स घसरत आहे. तर इतर सर्व वस्तू महाग होत आहे. ओपेक आणि रशियाच्या अचानक घेतलेल्या भूमिकेने जग महागाईच्या खाईत लोटल्या जात आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात सोन्याची किंमत $1980 आणि $1945 दरम्यान राहील. तर देशातंर्गत बाजारात 59,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम यादरम्यान या किंमती असतील.

धोका की मोका तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह आता व्याजदर वाढविण्याच्या मनस्थितीत नाही. गेल्या वर्षभरापासून केंद्रीय बँकेने आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता जनता हा बोजा सहन करु शकणार नाही. त्यामुळे लागलीच त्याचा परिणाम दिसून येईल. वायदे बाजारात सोने एका कालावधीसाठी जोर पकडेल. भारतीय बाजारात सोने 61,700 ते 62,500 प्रति 10 ग्रॅम या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. पण ओपेक देशांनी भूमिकेत नरमाई आणल्यास सोने-चांदीची चमक फिक्की पडू शकते.

आजचा भाव काय गुडरिटर्न्सनुसार,आज सोने-चांदीत घसरण झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत प्रति तोळा 100 रुपयांनी घसरली. आज हा भाव 55,950 रुपये आहे तर 24 कॅरेट एक तोळा सोने आज सकाळी 61,020 रुपये आहे. 110 रुपयांची प्रति तोळा घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळी चांदीचे भाव जाहीर झाले नाहीत. काल एक किलो चांदी 76,600 रुपये होती. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.