1 घर विकून तुम्ही अनेक मालमत्ता खरेदी करू शकता? आयकर नियम काय सांगतो?

तुम्ही संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या नवीन मालमत्ता घेतल्यास काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचे आहे की विकलेल्या मालमत्तेचा योग्य हिस्सा नवीन मालमत्तेत गुंतवला गेलाय. नवीन मालमत्तेत तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी यांचा संयुक्त हिस्सा ठेवू शकता.

1 घर विकून तुम्ही अनेक मालमत्ता खरेदी करू शकता? आयकर नियम काय सांगतो?
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्लीः जर तुम्ही घर विकून दुसरी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भांडवली नफ्याच्या नावाखाली तुमच्याकडून करही आकारला जातो. आयकरामध्येच कलम 54 चा नियम आहे, ज्यात निवासी मालमत्तेच्या विक्रीवर, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर सूट मिळू शकते. एक मालमत्ता विकताना आणि विहित मुदतीत दुसरी निवासी मालमत्ता खरेदी करतानाच हा नियम लागू होतो. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर सवलतीचा लाभ फक्त एक घर विकून दुसरे घर खरेदी केल्यावरच मिळतो. तेही जेव्हा एक घर विकल्यानंतर दुसरे घर घेतले जाते.

घर विकत घेतल्यास करमाफीचा लाभ मिळू शकतो का?

एक घर विकून दुसरे घर विकत घेतल्यास करमाफीचा लाभ मिळू शकतो का? तसेच अनेक मालमत्ता खरेदी करूनही त्याचा लाभ घेता येईल का, यावर अनेकदा चर्चा होत असते. आयकर नियम फक्त एकाच मालमत्तेबद्दल माहिती देतो, परंतु काही न्यायालयीन आदेशांमध्ये पुढे जाण्याचा मार्ग देखील नमूद केलेला आहे. एखाद्या व्यक्तीला एक घर विकून दोन फ्लॅट घेता येऊ शकतात, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आलेय. यामध्ये उद्भवणाऱ्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर सवलतीचा लाभ दिला जातो.

स्थिती नेमकी काय आहे?

जर तुम्ही घर विकल्यानंतर दोन फ्लॅट खरेदी करत असाल आणि तुम्हाला कर सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी आहेत. जर तुम्ही दोन फ्लॅट घेत असाल तर दोन्ही एकच निवासी युनिट मानले पाहिजेत. दोन्ही एकाच इमारतीत फ्लॅट किंवा डुप्लेक्स असतील, तरच करमाफीचा लाभ मिळेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संपूर्ण निवासी इमारत खरेदी करू शकता, जी केवळ एका कुटुंबासाठी आहे आणि ज्यामध्ये फक्त स्वयंपाकघर आहे. या परिस्थितीतही दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर सूट मिळू शकते.

मुलगी यांचा संयुक्त हिस्सा ठेवू शकता

तुम्ही संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या नवीन मालमत्ता घेतल्यास काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचे आहे की विकलेल्या मालमत्तेचा योग्य हिस्सा नवीन मालमत्तेत गुंतवला गेलाय. नवीन मालमत्तेत तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी यांचा संयुक्त हिस्सा ठेवू शकता. मुलाच्या किंवा मुलीच्या नावावर इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक नसेल तरच हे होईल. तुमच्या मृत्यूनंतर मालमत्तेची मालकी तुमच्या मुलीकडे किंवा मुलाकडे सहज हस्तांतरित केली जाऊ शकते, यासाठी मालमत्ता घेताना नॉमिनीचे नाव निश्चित करा.

किती टक्के हिस्सा असेल हे देखील निश्चित करा?

नॉमिनीच्या नावासोबत त्याच्या नावावर किती टक्के हिस्सा असेल हे देखील निश्चित करा. हे जंगम आणि स्थावर दोन्ही मालमत्तांना सारखेच लागू होते. त्यामुळे मालमत्ता आपल्या नावे करताना मुलगा किंवा मुलगी यांना कर भरावा लागणार नाही. नवीन मालमत्ता खरेदी करताना तुम्ही इंडेक्स केलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्याची संपूर्ण रक्कम गुंतवल्यास तुम्हाला दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

दोन घरे विकून 1 विकत घेतल्यास काय होईल?

एक प्रश्न असा पडतो की, दोन मालमत्ता विकून एक खरेदी केल्यास करमाफीचा फायदा होतो का? उत्तर होय आहे. आयकर कलम 54 अन्वये एखाद्या विशिष्ट कालावधीत मालमत्ता विकून घर खरेदी केल्यास दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर सवलतीचा लाभ मिळू शकतो. आयकर न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठात ही बाब निदर्शनास आलीय. जर दोन घरे विकली गेली आणि दोन्हीचा एकत्रित दीर्घकालीन भांडवली नफा नवीन घर खरेदीसाठी वापरला गेला तर करात सूट दिली जाऊ शकते, असे या निकालात म्हटले होते.

संबंधित बातम्या

कार खरेदीसाठी कोणती बँक सर्वात स्वस्त कर्ज देते, 10 लाखांवर किती EMI?

29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?

Published On - 6:16 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI