AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?

Sovereign Gold Bond : गोल्ड बॉन्ड्सचा कालावधी आठ वर्षांचा असेल. यासह पाचव्या वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे, जो पुढील व्याज भरण्याच्या तारखेला वापरला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज मिळेल, जे वर्षातून दोनदा दिले जाणार आहे. यामध्ये एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करू शकते.

29 नोव्हेंबरपासून स्वस्त सोने खरेदीची संधी, किती पैसे मोजावे लागणार?
Sovereign Gold Bond
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 4:42 PM
Share

नवी दिल्लीः Sovereign Gold Bond Scheme: सरकारने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स 2021-22 (सीरिज VIII) च्या सबस्क्रिप्शनसाठी सुरुवातीच्या तारखा जाहीर केल्यात. ही सीरिज 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत पाच दिवस सब्सक्रिप्शनसाठी खुली असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भारत सरकारच्या वतीने हा बाँड जारी करेल.

बाँडची इश्यू किंमत 4,791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित

सबस्क्रिप्शन कालावधीदरम्यान बाँडची इश्यू किंमत 4,791 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे ठरवण्यात आलेली किंमत आरबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आहे. मोदी सरकारने आरबीआयशी सल्लामसलत करून ऑनलाईन अर्ज करणार्‍या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीत 50 रुपये प्रति ग्रॅम सूट देण्याची परवानगी दिली. अशा गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉण्डची इश्यू किंमत 4,741 रुपये प्रति ग्रॅम सोन्यासाठी असेल.

गुंतवणूक कालावधी किती असणार?

गोल्ड बॉन्ड्सचा कालावधी आठ वर्षांचा असेल. यासह पाचव्या वर्षांनंतर बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे, जो पुढील व्याज भरण्याच्या तारखेला वापरला जाऊ शकतो. गुंतवणूकदारांना वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज मिळेल, जे वर्षातून दोनदा दिले जाणार आहे. यामध्ये एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करू शकते. यासह हिंदू अविभक्त कुटुंब किंवा HUF 4 किलो आणि ट्रस्ट आणि तत्सम संस्था एप्रिल ते मार्च या कालावधीत प्रत्येक आर्थिक वर्षात 20 किलो सोन्यात गुंतवणूक करू शकतात. केवायसी नियम फिजिकल गोल्जप्रमाणेच असतील. गुंतवणूकदार बँकांकडून (लहान वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता) स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), निवडक पोस्ट ऑफिस आणि निवडक स्टॉक एक्स्चेंज- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई यांच्याकडून सॉवरेन गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात.

2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली

सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू करण्यात आली. त्यामागे फिजिकल सोन्याची मागणी कमी करणे आणि सोने खरेदी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या घरगुती बचतीचा भाग आर्थिक बचतीमध्ये बदलणे हा उद्देश होता. MCX वर डिसेंबर सोन्याचे फ्युचर्स 47,728 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आजच्या वाढीनंतरही सोन्याचा भाव या महिन्याच्या उच्चांकावरून 1000 रुपयांनी कमी झाला. यामागील कारण म्हणजे यूएसच्या चलनविषयक धोरणातील पूर्वीच्या बदलाची भीती होती.

संबंधित बातम्या

डेबिट कार्डवर 10 लाखांपर्यंतचा मोफत अपघाती विमा, कोणाला लाभ मिळणार?

paytm : गेल्या 3 महिन्यात पेटीएमला 482 कोटींचा फटका, युजर्सच्या संख्येत चांगली वाढ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.