विमा धारक हरवल्यास कुटुंब कशा पद्धतीनं मिळवू शकतात विमा हक्क, 4 सोपे मार्ग जाणून घ्या…

जरी विमाधारकाच्या मृत्यूवर दावा घेणे सोपे असले तरी पॉलिसी घेतलेली व्यक्ती हरवली असेल आणि त्यांच्या अस्तित्वाची किंवा मृत्यूची माहिती नसेल तर हा दावा मिळवणे फारच अवघड आहे. life insurance policy

विमा धारक हरवल्यास कुटुंब कशा पद्धतीनं मिळवू शकतात विमा हक्क, 4 सोपे मार्ग जाणून घ्या...
SBI ग्राहकांसाठी खूशखबर : 2 लाखांचा विमा मोफत मिळणार
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 6:51 PM

नवी दिल्लीः स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी विमा पॉलिसी घेणे महत्त्वाचे असते. विशेषतः नामित व्यक्ती आणि कुटुंबातील सदस्य विमाधारकाच्या मृत्यू किंवा दुर्घटनेवर दावा करू शकतात. जरी विमाधारकाच्या मृत्यूवर दावा घेणे सोपे असले तरी पॉलिसी घेतलेली व्यक्ती हरवली असेल आणि त्यांच्या अस्तित्वाची किंवा मृत्यूची माहिती नसेल तर हा दावा मिळवणे फारच अवघड आहे. (how to claim life insurance policy if a policy holder is missing know easy process)

…म्हणून बऱ्याचदा अडचणी येतात

मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर नियमांशिवाय दावा करू शकत नसल्यानं बऱ्याचदा अडचणी येत असतात. विशेषत: चक्रीवादळ, भूस्खलन, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये पॉलिसीधारक हरवले असेल, तर ही समस्या आणखी वाढते. परंतु नियमांनुसार काही गोष्टींची काळजी घेणे आणि त्या प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे.

हरवलेल्या सदस्यानंतर कुटुंबानं कसा करावा दावा

हरवलेल्या व्यक्तीच्या नावे जर जीवन विमा पॉलिसी असेल तर कुटुंब विमा दावा करून आर्थिक सहाय्य मिळवू शकेल. हरवलेल्या व्यक्तीला यासाठी मृत घोषित करावे लागेल. यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागणार आहे.

न्यायालयात याचिका दाखल करायची

विमाधारक एखाद्या नैसर्गिक आपत्तीत हरवला असल्यास कुटुंबाने प्रथम त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तसेच न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. कायदेशीर वारसांना हरवलेल्या व्यक्तीस सिद्ध करण्यासाठी एफआयआरची प्रत आणि शोध न घेता येणारा पोलीस अहवालदेखील सादर करावा लागेल. जर तपासणीत खात्री झाली की, ती व्यक्ती खरोखर हरवलेली आहे, तर त्याला न्यायालयातर्फे मृत मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत न्यायालय विमा कंपनीला पैसे भरण्यास सांगू शकतो.

सात वर्षे वाट पाहावी लागेल

भारतीय पुरावा अधिनियम कलम 108 नुसार, हरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी एफआयआर दाखल करावा लागेल. त्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध लागला नाही, तर सात वर्षांनंतर विम्याचा दावा करता येतो. कारण या काळात हरवलेल्या व्यक्तीला मृत मानले जाते.

सरकारी यादीमध्ये नावावर दावा करू शकतो

पूर, भूकंप, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे विमाधारक हरवला असेल तर सरकार या काळात हरवलेल्या लोकांना मृत मानते. तसेच हरवलेल्या व्यक्तींची यादी दिल्यास कुटुंबातील सदस्य दाव्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणून सात वर्षे थांबण्याची गरज नाही.

संबंधित बातम्या

Post Office मध्येही कोरोना लसीची करू शकता नोंदणी, ही कागदपत्रे बरोबर घेऊन जा

वर्ष 2020-21 अर्थव्यवस्थेसाठी ‘गडद’, चुका स्वीकारा आणि विरोधकांचं ऐकाः पी चिदंबरम

how to claim life insurance policy if a policy holder is missing know easy process

Non Stop LIVE Update
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.