कठीण काळात PF चे 7 लाख रुपये ठरु शकते मोठी मदत, काढण्याची संपूर्ण प्रक्रिया काय?

| Updated on: May 14, 2021 | 4:24 PM

प्रत्येक पीएफ खातेदार आणि त्यांच्या कुटुंबाला याची माहिती असणे आवश्यक असते. जेणेकरुन अडचणींच्या वेळी तुम्हाला याद्वारे आर्थिक मदत मिळू शकते. (How To Claim PF Insurance)

कठीण काळात PF चे 7 लाख रुपये ठरु शकते मोठी मदत, काढण्याची संपूर्ण प्रक्रिया काय?
pf
Follow us on

मुंबई : नोकरी करणाऱ्या अनेकांच्या पगारातील काही ठराविक रक्कम ही पीएफच्या रुपात जमा करतात. ही रक्कम गरज भासल्यास किंवा सेवानिवृत्ती घेतेवेळी त्यांना फार उपयोग पडते. विशेष म्हणजे पीएफ खात्यासह खातेदाराला विमाही दिला जातो. हा विमा जीवन जोखीम धोरणासारखा असतो. तसेच जर दुर्देवाने एखाद्या खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना याचा फायदा होतो. हा विमा 7 लाख रुपयांचा असतो. जो दुर्दैवाने खातेदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना दिला जातो. (How To Claim 7 lakh PF Insurance)

मात्र आपल्यापैकी अनेकांनी या विमासंबंधित अनेक गोष्टी माहिती नसतात. हे पैसे कसे काढता येतात, याचीही आपल्याला माहिती नसते. प्रत्येक पीएफ खातेदार आणि त्यांच्या कुटुंबाला याची माहिती असणे आवश्यक असते. जेणेकरुन अडचणींच्या वेळी तुम्हाला याद्वारे आर्थिक मदत मिळू शकते.

विमा कसा असतो?

हा विमा एका लाईफ रिस्क पॉलिसीप्रमाणे असते. कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुअरन्स योजनेतंर्गत हा विमा पीएफ खातेधारकांना दिला जातो. या योजनेतंर्गत ग्राहकाला विमा दिला जातो. जो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला दिला जातो. यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याला 7 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. पूर्वी ही रक्कम 6 लाख रुपयांपर्यंत होती.

विमा कधी दिला जातो?

EPFO मध्ये सक्रीय कर्मचाऱ्याचा जर सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाला तर त्याला हा विमा क्लेम करता येतो. ही रक्कम 7 लाख रुपयांपर्यंत असते आणि ती वेगळ्या प्रकारे दिली जाते, एखाद्या कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या कालावधीवर ही रक्कम अवलंबून असते. या विम्याच्या अंतर्गत प्राप्त रक्कम गेल्या 12 महिन्यांत प्राप्त झालेल्या मासिक पगाराच्या 30 पट असते.  पण ती सात लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

कोणाला आणि कसे मिळतात पैसे?

इतर बचत योजना आणि बँकिंग प्रणालीप्रमाणेच या विमा अंतर्गत खातेदारांच्या मृत्यूनंतर हे पैसे मिळतात. त्या खातेधारकाच्या कुटुंबियांना किंवा नॉमिनीला हे पैसे दिले जातात. त्यासोबतच बर्‍याच परिस्थितींमध्ये कायदेशीर वारसदेखील यासाठी दावा करु शकतात. मात्र योग्य त्या कारवाईनंतर त्यांना पैसे दिले जातात. यासाठी सर्वात आधी ईपीएफओशी संपर्क साधणे आवश्यक असते.

पीएफवर ‘या’ सुविधाही उपलब्ध

पीएफ खात्यावर विम्याबरोबरच खातेधारकाला पेन्शन, कर्ज आणि इतर सुविधा देखील मिळतात. याद्वारे लोक आवश्यकतेनुसार पैसे घेऊ शकतात आणि निवृत्तीनंतर पेन्शन घेऊ शकतात. तसेच, इपीएफओ आपत्कालीन परिस्थितीत पैसे काढण्याची परवानगी देतो. त्यानुसार तुम्ही बर्‍याच वेळेस आपले पैसे काढू शकता. (How To Claim 7 lakh PF Insurance)

संबंधित बातम्या : 

Post Office PPF Account: 9 हजारांची रक्कम जमा करण्यावर 29 लाखांचा फायदा, करातही मोठी सूट

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प