Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय?

या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते, असे म्हटले जाते. (Akshaya Tritiya 2021 Gold Sliver Price)

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय?
सोने-चांदी भाव

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या दिवशी बहुतांश जण एक ग्रॅम का होईना पण सोने खरेदी करतात. या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते, असे म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील ठिकठिकाणचे सोन्याचे दर काय? त्यात बदल झाला का? सोने-चांदी स्वस्त झाले की महाग? याची माहिती तुम्हाला देणार आहोत. (Akshaya Tritiya 2021 Gold Sliver Rate Today 14 May 2021)

सोन्याचे नवे दर काय? (Gold Price on 14 May 2021)

आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 44 हजार 720 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 45 हजार 720 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45 हजार 900 इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 49 हजार 900 इतका आहे.

⏩महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे दर

🛑नागपूर –

💠सोने- 45 हजार 750 रुपये प्रति 10 ग्रॅम
💠चांदी – 711 रुपये प्रति 10 ग्रॅम

🛑नाशिक –

💠सोने – 47 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम
💠चांदी – 71 हजार 800 रुपये प्रति किलो

🛑पुणे –

💠सोने – 48 हजार 550 रुपये  प्रति तोळा
💠चांदी – 72 हजार 130 रुपये प्रति किलो

🛑मुंबई  –

💠सोने – 45 हजार 490 रुपये  प्रति तोळा
💠चांदी – 72 हजार 130 रुपये प्रति किलो

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?

ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्रा यांच्या मते, अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय्य तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करु इच्छित असाल, तर मग जाणून घ्या सर्वात शुभ मुहूर्त –

❇️ सकाळी 7:30 ते 9:43 वाजेपर्यंत

❇️ दुपारी 12:10 ते सायंकाळी 4:39 वाजेपर्यंत

❇️ सायंकाळी 6:50 ते रात्री 9:08 वाजेपर्यंत

लक्षात ठेवा – राहुकाल सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल, यादरम्यान कोणतेही शुभ कार्य आणि खरेदी करणे टाळा. (Akshaya Tritiya 2021 Gold Sliver Price Rate Today 14 May 2021)

संबंधित बातम्या : 

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहिती

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला दान का करावे?, जाणून घ्या ही पौराणिक कथा