Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प

सराफ बाजारातील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या एक रुपयाचीही उलाढाल होऊ शकणार नाही. (Akshaya Tritiya Jalgaon Gold )

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेला 100 कोटींची उलाढाल होणाऱ्या जळगावात यंदा सोने खरेदी ठप्प
Gold Price Today

जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या व्यापारासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफा बाजाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर या सराफ बाजारात एक रुपयाचीही उलाढाल होणार नाही. अशा परिस्थितीत सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत. साधारणपणे 100 कोटींची उलाढाल दरवर्षी या मुहूर्तावर होत असते. (Akshaya Tritiya 2021 Jalgaon Gold Silver Market Closed)

सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णनगरी ठप्प

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जाणारा अक्षय्य तृतीयेचा सण या सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला खूप महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेला खरेदी केलेले सोने हे अक्षय्य मानले जाते. ‘सुवर्णनगरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावातील सराफ बाजारात दरवर्षी या सणाच्या दिवशी सोने खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण, गेल्या वर्षी कोरोनामुळे अक्षय्य तृतीयेला सराफ बाजारात सोने आणि चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहारच होऊ शकले नव्हते.

यावर्षी देखील कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी कडक निर्बंध घोषित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सराफ बाजारातील सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या एक रुपयांचीही उलाढाल होऊ शकणार नाही.

दीड हजार सराफ व्यापाऱ्यांना फटका

जळगाव शहरात सुमारे 125 ते 150 तर संपूर्ण जिल्ह्यात दीड हजार सराफ व्यापारी आहेत. या सर्वांना कडक निर्बंधाचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सराफ व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. अशाही परिस्थितीत व्यापाऱ्यांना इतर खर्च सुटलेले नाहीत. (Akshaya Tritiya Jalgaon Gold )

दरम्यान, आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 44 हजार 720 इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 45 हजार 720 रुपये इतका आहे. तर दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45 हजार 900 इतका आहे. तसेच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 49 हजार 900 इतका आहे.

सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता?

ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्रा यांच्या मते, अक्षय्य तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय्य तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करु इच्छित असाल, तर मग जाणून घ्या सर्वात शुभ मुहूर्त

संबंधित बातम्या :

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीया दिवशी सोने-चांदी स्वस्त की महाग, मुंबईसह महाराष्ट्रातील सोन्याचे नवे दर काय?

(Akshaya Tritiya 2021 Jalgaon Gold Silver Market Closed)