शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा ‘या’ चार गोष्टी

| Updated on: Dec 26, 2021 | 9:13 AM

तुम्ही देखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू इच्छिता? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अनेकवेळा आपण शेअर बाजाराबाबत पूर्ण माहिती न घेताच गुंतवणूक करतो. यामध्ये बऱ्यापैकी जोखमी असते. तसेच यामधून चांगला परतावा मिळेलच याची देखील खात्री नसते.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिता; तर लक्षात ठेवा या चार गोष्टी
गुंतवणूक हजारात, रिटर्न लाखात; शेअर फसवणुकीचा ‘सोशल’ पॅटर्न!
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही देखील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू इच्छिता? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. अनेकवेळा आपण शेअर बाजाराबाबत पूर्ण माहिती न घेताच गुंतवणूक करतो. यामध्ये बऱ्यापैकी जोखमी असते. तसेच यामधून चांगला परतावा मिळेलच याची देखील खात्री नसते. मात्र तुम्ही जर नियोजनबद्ध पद्धतीने मार्केटचा पूर्ण अभ्यास करून गुंतवणूक केल्यास तुम्ही देखील यामधून मोठा नफा कमाऊ शकता. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

होमवर्क करा

क्षेत्र कोणतेही असो होमवर्कला पर्याय नसतो. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर होमवर्क हा करावाच लागलो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार आहात तिचा चांगला अभ्यास करा, अभ्यास करण्यापूर्वी गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका.  कंपनीचा अभ्यास करायचा म्हणचे नेमके काय करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच. कंपनीचा अभ्यास करायचा म्हणजे तुम्ही ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणार आहात आधी त्या कंपनीबाबत सर्व माहिती गोळा करा. ती कंपनी त्या क्षेत्रातील लीड कंपनी आहे का ते बघा. त्यानंतरच गुंतवणूकीचा निर्णय घ्या. अशा गुंतवणूकीमधून तुम्हाला फायदा होऊ शकतो.

कमी जोखमी, जादा परताव्याचे सूत्र अमलात आणा

तुम्ही जेव्हा शेअरमार्केटचा अभ्यास करता, तेव्हा तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात. कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये अधिक परतावा मिळून शकतो, कोणत्या कंपनीचे शेअर खरेदी करण्यामध्ये जोखीम आहे, या सर्व गोष्टींचे तुम्हाला अकलन होते. त्यानंतर निर्णय घेणे सोपे होते. मात्र शेअर बाजारात गुंतवणूक करताना नेहमी कमी जोखील जास्त परतावा हे सूत्र लक्षात ठेवा. म्हणजे गुंतवणूक अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये करा ज्या कंपन्यामध्ये जोखमी कमी असेल व भविष्यात अधिक चांगला परतावा मिळू शकतो.

मिळणाऱ्या परताव्याची परत गुंतवणूक करा

तुम्हाला जर शेअर मार्केटमधून चांगला नफा किंवा परतावा मिळाला असेल तर गुंतवणूक लगेच काढू घेऊ नका. मिळणारा परतावा हा दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये गुंतवा त्यातून तुम्हाला अधिक फायदा होण्याची शक्यता असते.

या व्यवसायात यशस्वी झालेल्यांना फॉलो करा

तुम्हाला जर शेअरबाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर हा एक आणखी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. तुम्ही सतत काहीना काही या क्षेत्राबाबत नवीन शिकले पाहिजे. काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. यासाठी तुम्हाला या क्षेत्रातील जे यशस्वी गुंतवणूकदार आहेत, त्यांना फॉलो करावे लागले. त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. शेअर बाजारामध्ये कमीत कमी गंतवणुकीमधून अधिकाधिक नफा कसा कमावला जाऊ शकतो याचा काणमंत्र तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. या सर्व गोष्टी तुम्ही अमलात आणल्यास तुम्ही देखील एक यशस्वी शेअर मार्केट व्यवसायिक होऊ शकतात यात शंका नाही.

संबंधित बातम्या

डेबिट कार्ड सुरक्षीत कसे ठेवाल?; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आयपीओ ट्रॅकर: पैसे कमाईची बंपर ऑफर, ‘ही’ कंपनी करणार मालामाल!

अर्थ नियोजन वाचवेल तुमचा गृहकर्जाचा ताण, या 4 गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जाच्या घरातही सुखाची झोप