अर्थ नियोजन वाचवेल तुमचा गृहकर्जाचा ताण, या 4 गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जाच्या घरातही सुखाची झोप

अर्थ नियोजन वाचवेल तुमचा गृहकर्जाचा ताण, या 4 गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जाच्या घरातही सुखाची झोप

आर्थिक निकष न पाळल्यास  स्वप्नातील घर घेण्यासाठी स्वप्नांशी झगडावे लागते आणि पुढील 15 ते 20 वर्षे सुखात लोळण घेण्याच्या स्वप्नांशी तडजोड करावी लागते. यामुळे गृहकर्ज घेताना या चार गोष्टींची काळजी घ्यावी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 25, 2021 | 2:18 PM

मुंबई :  होम लोन (Home Loan) कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात मोठे कर्ज असते. जे 15 वर्ष अथवा त्याही पेक्षा जास्त कालावधीसाठी घ्यावे लागते. त्यामुळे ज्यांना गृह कर्ज घ्यायचे त्यांनी पुढील 15 ते 20 वर्षांपर्यंत आर्थिक  जबाबदारी पेलण्याची मानसिक तयारी करायला हवी. कर्ज देतेवेळी बँकासुद्धा कर्जदाराची आर्थिक परिस्थिती तपासतात. त्यांचा  क्रेडिट स्कोर (Credit Score) चेक (check) करतात.  त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी आपण काही तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे.  गृहकर्ज घेण्यापूर्वी या 4 महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करता कामा नये. या 4 महत्त्वाच्या बाबी  गृहकर्ज घेताना उपयोगी ठरू शकतात.

डाऊन पेमेंट ची रक्कम हाताशी ठेवा

भारतीय रिझर्व रिझर्व बँकेने (RBI) बँकांना कर्जदारांसाठी 70 ते 90 टक्के अर्थपुरवठा करण्याचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. अर्जदारांना उर्वरित रक्कम स्वतः उभी करावी लागते. म्हणजे साधारणतः 10 ते 30 टक्के रक्कम स्वतः उभी करावी लागते. त्यामुळेच  कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी एवढ्या रकमेची तरतूद करणे गरजेचे आहे.कर्ज घेताना डाऊन पेमेंटची (Down Payment) रक्कम जेवढी जास्त तेवढं तुमचं क्रेडीट चांगले असते आणि तुमच्यावर कर्जाच्या हप्त्यांत स्वरूपात येणारा ताणही कमी होतो. त्यामुळे कर्ज घेताना डाऊन पेमेंट ची रक्कम सर्वाधिक जमा करणे हे भविष्यातील अडचणींना गृहीत धरून योग्य ठरते.

क्रेडिट स्कोर चांगला ठेवा

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोर Credit Score) काय आहे याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. कारण क्रेडिट स्कोर जेवढा चांगला तेवढे तुम्हाला कर्ज मिळण्यास तसेच कर्ज मंजुरी मिळण्यात सोयीचे ठरते. लवकरात लवकर कर्ज मंजुरी मिळते ज्यांचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त अधिक असतो त्यांना कर्ज मंजुरी लवकर होत मिळते अशा लोकांना कर्ज घेताना कोणताही त्रास होत नाही चांगले क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांसाठी काही बँकांनी व्याजदर कपात केल्याचे दिसून येते

EMI वर ठेवा लक्ष

दर महिन्याला कर्ज हप्ता गृह कर्ज हप्ता भरणाऱ्या ग्राहकांना बँक प्राथमिकता देते त्यामुळे पहिल्यांदा नवीन घर घेणाऱ्या व्यक्तीला हफ्ता एकूण उत्पन्नाच्या 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत चुकता करता येतो. रक्कम वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होतो. कारण हफ्ता चुकविला तर त्याच्यावर चक्रवाढ  व्याजाचा बोजा पडत नाही. तुमच्याकडून मोठ्या रकमेच्या हप्त्याचा भरणा होत नसेल तर गृहकर्जाचा कालावधी तुम्ही वाढून घ्यायला हवा. आपत्कालीन निधी तयार ठेवा

दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करा

अनेकदा गृहकर्ज गेला घेतल्यानंतर काही दुःखद प्रसंगी किंवा अचानक आलेल्या खर्चामुळे कर्ज वेळेत फेडणे कठीण जाते. कर्ज वेळच्या वेळी  न फेडल्यास बँक तुम्हाला भुर्दंड लावते. तसेच चक्रवाढ व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. या बरोबरच तुमच्या क्रेडिट स्कोर वरही त्याचा दुष्परिणाम दिसून येतो. त्यामुळे कर्ज घेतानाच एक आपत्कालीन निधी सुद्धा तयार करणे गरजेचे आहे. या निधीमध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम जमा करावी. ज्यामुळे अचानक आलेल्या खर्चाच्या प्रसंगी हे रक्कम तुम्हाला उपयोगी ठरेल आणि कर्जाचा हप्ता ही वेळेत तुम्ही  चुकता करू शकाल.

संबंधित बातम्या 

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

EPFO अलर्ट: नॉमिनी अपडेटसाठी अवघे काही दिवस, अन्यथा 7 लाखांवर पाणी!

यंदाच वर्ष आयपीओचं: पेटीएम टॉप, 2022 मध्ये 2 लाख कोटींचे उद्दिष्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें