आयपीओ ट्रॅकर: पैसे कमाईची बंपर ऑफर, ‘ही’ कंपनी करणार मालामाल!

टीबीओ डॉट कॉम ही आघाडीची ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईट मानली जाते. टीबीओ टेकची पॅरेंट कंपनी टीबीओ टेक लिमिटेडने आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सादर केली आहे. 2100 कोटींच्या इश्यूपैकी 900 कोटी फ्रेश इश्यू असणार आहेत.

आयपीओ ट्रॅकर: पैसे कमाईची बंपर ऑफर, ‘ही’ कंपनी करणार मालामाल!
IPO ahead
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:59 PM

नवी दिल्ली- आगामी वर्षात आयपीओचा डंका कायम राहण्याची शक्यता आहे. नामांकित कंपन्यांचा आयपीओ बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुंतवणुकदारांच्या नजरा नव्या आयपीओच्या यादीकडे लागल्या आहे. दरम्यान, आघाडीची ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईट TBO आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सादर केली आहे. आयपीओच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारण्याची स्ट्रॅटेजी आखली आहे.

टीबीओ टेक लिमिटेडची तयारी:

टीबीओ डॉट कॉम ही आघाडीची ट्रॅव्हल बुकिंग वेबसाईट मानली जाते. टीबीओ टेकची पॅरेंट कंपनी टीबीओ टेक लिमिटेडने आयपीओ साठी आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सादर केली आहे. 2100 कोटींच्या इश्यूपैकी 900 कोटी फ्रेश इश्यू असणार आहेत. तर उर्वरित 1200 कोटी ऑफर फॉर सेलसाठी असतील. कंपनीला इश्यूद्वारे मिळालेल्या रकमेतून कंपनीच्या वाढीसाठी 570 कोटी आणि प्लॅटफॉर्मच्या बळकटीसाठी 90 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 2006 मध्ये स्थापित कंपनीचे मुख्य काम ट्रॅव्हल एजंट आणि टूर ऑपरेटर्सला सेवा प्रदान करण्याचे आहे.

आयपीओचं रिपोर्ट कार्ड! मागील काही वर्षात आयपीओद्वारे कोट्यावधी रुपये उभारण्यात आले. वर्षनिहाय उलाढालींची आकडेवारी खालीलप्रमाणे:

o वर्ष 2017- 68,827 कोटी o वर्ष 2020- 26, 613 कोटी o वर्ष 2021- 1 लाख 18 हजार कोटी

वर्ष 2022 आयपीओच्या कामगिरीचं!

वर्ष 2021 नंतर 2022 मध्ये आयपीओची सर्वोत्तम कामगिरी राहण्याची शक्यता आहे. कोटक महिंद्रा कॕपिटलने आगामी वर्षात 2 लाख कोटी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एका अहवालानुसार, पुढील वर्षात आयपीओचे 15 अरब डॉलरचे प्रस्ताव यापूर्वीच सेबीकडे दाखल झाले आहेत. तर 11 अरब डॉलरचे लवकर प्राप्त होण्याची शक्यता आहे.

गुंतवणुकदारांचा ‘सर्वोच्च’ प्रतिसाद!

एका अहवालानुसार, 59 कंपनीच्या आयपीओ पैकी 36 कंपन्यांना दहा पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. त्यापैकी 6 कंपन्यांच्या आयपीओला 100 पटी पर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले. 8 आयपीओला तीन पट आणि उर्वरित 15 कंपन्यांच्या आयपीओला तीन पटीपर्यंत सबस्क्रिप्शन मिळाले आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आयपीओला रिटेल गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती दिली आहे. एकूण इश्यू मध्ये रिटेलचा हिस्सा 10 पटीहून अधिक आहे.

आयपीओ म्हणजे काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक आॕफर. कंपनीद्वारे मार्केटमध्ये पैसे गोळा/उभारण्याचा आयपीओ महत्वाचा मार्ग आहे.

संबंधित बातम्या: Ind vs SA: कॅप्टन निवडणं माझं काम नाही, राहुल द्रविडने स्पष्ट केली भूमिका PKL 2021-22 LIVE Score and Updates, Patna Pirates vs U.P. Yoddha: पुणेरी पलटनची बाहुबली तेलगु टायटन्सवर छोटी आघाडी Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.