गाडीला फूड वॅनमध्ये रूपांतर करायचंय? परवानगी कुठून आणि कशी मिळते? जाणून घ्या पूर्ण माहिती!
How To Turn Your Vehicle Into A Food Van : गाडीला फूड वॅनमध्ये कसं रुपांतर करायचं? कोणत्या परवानग्या आवश्यक आणि प्रक्रिया कशी पार पाडायची, जाणून घ्या सर्व तपशील!

आजच्या काळात लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलत चालली आहे. फास्ट फूड आणि स्ट्रीट फूडच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. रेस्टॉरंट्सपेक्षा कमी खर्चात आणि कमी जागेत फूड वॅन व्यवसाय सुरू करून दररोज चांगला नफा कमावणं शक्य आहे. म्हणूनच आज अनेक तरुण आणि नवउद्योजक फूड वॅन व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत.
जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल आणि तुम्हाला खाद्य क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल, तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. फूड वॅन म्हणजे केवळ एक वाहन नाही, तर हे चालतं रेस्टॉरंट असतं! पण या व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या कायदेशीर अटी पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे.
फूड वॅन व्यवसायासाठी सर्वप्रथम ‘FSSAI’ (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) कडून लायसन्स मिळवणं बंधनकारक असतं. यासाठी https://foscos.fssai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागतो. हा लायसन्स 1 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतो आणि त्यासाठी 100 रुपयांपासून 7500 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते, जे तुमच्या व्यवसायाच्या स्केलनुसार ठरवले जाते.
याशिवाय, स्थानिक नगर परिषद किंवा महापालिकेकडून ‘ट्रेड लायसन्स’ घेणं देखील अनिवार्य आहे. याशिवाय गाडीचे कमर्शियल रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे आणि फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावं लागतं. यामुळे तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या नोंदणीकृत होतो आणि भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागत नाही.
फूड वॅन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी गाडीचं योग्य मॉडिफिकेशन देखील गरजेचं असतं. गाडीमध्ये स्वच्छ आणि व्यवस्थित किचन सेटअप, अन्न शिजवण्यासाठी आवश्यक उपकरणं, पाण्याची पुरेशी सोय, आणि अन्न साठवण्यासाठी हायजिन फॉलो करणारी व्यवस्था असणं गरजेचं असतं. अन्न तयार करताना FSSAI च्या सर्व सुरक्षा निकषांचे पालन करणं हे ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी अनिवार्य आहे.
एकदा का सर्व परवाने, लायसन्स आणि गाडीचं मॉडिफिकेशन पूर्ण झालं, की तुम्ही तुमचा फूड वॅन व्यवसाय सुरू करू शकता. बाजारात स्ट्रीट फूडची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे कमी गुंतवणुकीत आणि कमी जागेत सुरू होणारा हा व्यवसाय तुमच्या आर्थिक स्वावलंबनाचा मोठा आधार बनू शकतो.
