ICICI-Axis बँकांचा ग्राहकांना मोठा झटका, आता खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी लागणार फी

आता या दोन्ही बँकेतून नॉन-बिझनेसच्या तासांमध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवशी पैसे काढल्यास त्यावर शुल्क आकारले जाणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:26 PM, 3 Nov 2020
एका स्मॉल फायनान्स बँकेने महिलांसाठी खास बचत खातं सुरू केलं आहे. या खात्यामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे.

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँका असलेल्या ICICI Bank आणि Axis Bank ने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आता या दोन्ही बँकेतून नॉन-बिझनेसच्या तासांमध्ये आणि सुट्ट्यांच्या दिवशी पैसे भरण्यासाठी त्यावर शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही बँकातून पैसे भरताना जरा जपूनच. नाही तर तुमच्या खात्यातून शुल्कापोटीची रक्कम कापलीच म्हणून समजा.

सीएनबीसी टीव्हीच्या अहवालानुसार, तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी किंवा बँकेच्या वेळेव्यतिरिक्त कॅश रिसायकल केली किंवा कॅश डिपॉझिट मशीन वापरून त्यात पैसे डिपॉझिट केले तर या सुविधेची फी म्हणून तुम्हाला 50 रुपये द्यावे लागणार आहेत. बँकेच्या जारी केलेल्या नियमानुसार, सुट्टीच्या दिवशी आणि इतर कामाच्या दिवशी संध्याकाळी 6 ते सकाळी 8 या वेळेत ICICI बँक ग्राहकांकडून फी म्हणून 50 रुपये शुल्कापोटी घेणार आहे.

या खात्यावर नाही घेतली जाणार फी

ज्येष्ठ नागरिक, बचत बँक खाती, जनधन खाती, अपंग आणि दृष्टिबाधितांची खाती आणि विद्यार्थ्यांच्या खात्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असं बँकेनं म्हटलं असून तसं वृत्त सीएनबीसीने दिलं आहे.

BoB देखील आकारणार शुल्क

1 नोव्हेंबरपासून बँक ऑफ बडोदानेही आपल्या ग्राहकांना दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार करण्यासाठी शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. या निर्णयामुळे आता चालू खात्यातून / ओव्हरड्राफ्ट / सीसीमधून महिन्यातून 3 वेळा बेस शाखा, लोकल नॉन बेस शाखा आणि बाहेरच्या शाखेतून पैसे काढणं मोफत असणार आहे. पण चौथ्यांदा जर असं व्यवहार केला तर त्यासाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचं बँकेनं स्पष्ट केलं आहे.

1 ऑगस्टपासून अ‍ॅक्सिस बँकही आकारणार सुविधा शुल्क

अ‍ॅक्सिस बँकेनेही बँक आणि राष्ट्रीय बँकेच्या सुट्टीच्या दिवसांमध्ये व्यवहारावर करण्यावर 50 रुपये शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. ही सुविधा फी 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे.

इतर बातम्या – 

चालू खात्याबाबत 15 डिसेंबरपासून नवा नियम, कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर परिणाम काय?

तुमच्याकडेही आहे ‘या’ नंबरची नोट, तर यंदाच्या दिवाळीत व्हाल लखपती