AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RBI ने रेपो रेट वाढवल्यावर तुमचा EMI किती रुपयांनी वाढणार? वाच नेमकं गणित काय?

येत्या 7 ऑक्टोबर आरबीआय नवीन पतधोरण जाहीर करणार आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती देतील. रेपो रेटमध्ये 25 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

RBI ने रेपो रेट वाढवल्यावर तुमचा EMI किती रुपयांनी वाढणार? वाच नेमकं गणित काय?
RBI REPO RATEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 11:17 PM
Share

RBI च्या पतधोरण समीतीची सध्या बैठक सुरू आहे. ही बैठक येत्या 7 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. या बैठकीत रेपो रेटविषयी महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. रेपो रेट वाढला तर सामान्यांच्या डोक्यावरील ईएमआयचं ओझं वाढणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान, रेपो रेट वाढला तर तुमचा ईएमआय किती रुपयांनी वाढणार हे जाणून घेऊ या…

येत्या 7 ऑक्टोबर आरबीआय नवीन पतधोरण जाहीर करणार आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती देतील. रेपो रेटमध्ये 25 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. रेपो रेट वाढल्यास त्याचा परिणाम बँकांच्या कर्जदरांवर होऊ शकतो. विशेषतः फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या होम लोनच्या EMI वर त्याचा थेट परिणाम जाणवू शकतो. उदाहरणार्थ, 20 वर्षांच्या कालावधीसाठी 8.5 टक्के व्याजदराने घेतलेल्या होम लोनचा व्याजदर 0.50 टक्क्यांनी लाढून 9 टक्के झाल्यास EMI किती वाढेल, हे पाहूया.

10 लाखांचे कर्ज: 8.5 टक्के दराने EMI सुमारे 8,678 रुपये असल्यास आणि 9 टक्के व्याजर झाल्यास झाल्यास ईएमआय 8,997 रुपये होईल. म्हणजेच महिन्याला तुम्हाला 319 रुपये द्यावे लागतील..

20 लाखांचे कर्ज: EMI 17,356 रुपयांवरून सुमारे 17,995 रुपयांपर्यंत वाढेल. म्हणजेचे तुमच्या ईएमआयमध्ये 638 रुपयांची मासिक वाढ होईल.

30 लाखांचे कर्ज: 26,035 रुपयांच्या ईएमआय 26,992 रुपये होईल. म्हणजेच तुम्हाला दरमहा 957 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

40 लाखांचे कर्ज: EMI 34,713 रुपयांवरून थेट 35,989 होईल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,276 रुपये जास्त द्यावे लागतील. वर्षभरात हा अतिरिक्त खर्च सुमारे 15,300 रुपयांपर्यंत वाढतो.

50 लाखांचे कर्ज: 43,391 रुपयांचा ईएमाय हा 44,986 रुपये होईल. म्हणजेच दरमहा 1,595 रुपये तुम्हाला अतिरिक्त द्यावे लागतील. वर्षभरात जवळपास 19,100 रुपयांचा आर्थिक भार वाढू शकतो.

म्हणूनच रेपो रेटमधील छोटी वाढही दीर्घकालीन कर्जदारांच्या बजेटवर परिणाम करू शकते. मात्र प्रत्यक्ष EMIमध्ये बदल बँकेचा व्याजदर, कर्जाचा प्रकार आणि उर्वरित कालावधी यावर अवलंबून असतो.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?